Aashti Assembly Constituency : आष्टी मतदारसंघात महायुतीत पेच, सुरेश धस यांचा अजब मार्ग

Suresh Dhas : सुरेश धस यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी गर्दी करत निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे.

महायुतीच्या नेत्यांना माझी विनंती आहे, तिकीट कोणालाच देवू नका, आम्ही तिघे उमेदवारीसाठी इच्छुक आहोत, तेव्हा तिघांना अपक्ष उभा करा, जे होईल ते पाहू, असं भाजपाचे माजी मंत्री सुरेश धस यांनी जाहीर भाषणातून वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे बीडमध्ये निवडणूक लढवायचे म्हटलं की अंगावर काटा येतोय, असं देखील सुरेश धस यांनी म्हंटलं आहे. उमेदवारीवरून पेच निर्माण झाल्याने धस समर्थक आक्रमक झाले आहेत. तुम्ही निवडणूक लढवाच, असा आग्रह धस यांच्याकडे धरला जात आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी आष्टी येथील त्यांच्या निवासस्थानाच्या समोर घोषणाबाजी देखील केली. यावेळी सुरेश धस यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढताना हे वक्तव्य केलं आहे.

कोणालाच कोणाचा राग नको, रणिंगच पाहिजे, आम्ही तिघे एकाच महायूतीचे आहोत. तेव्हा आसा निर्णय पक्षांनी घ्यावा महायुतीचे सरकार याव, यासाठी आम्हा तिन्ही ईच्छूक उमेदवारांना कोणतच पक्षाच तिकीट देऊ नका व उपक्ष उभे करा, ज्याचं जास्त वजन आहे, तो निवडून येईल व ह्या जागेचा पेच सोडवावा अशी माझी विनंती आहे. आस मत भाजपाचे नेते माजी आमदार सुरेश धस यांनी कार्यकर्त्यां व्यक्त केलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com