EPFO New Rule: EPFO च्या नियमांत मोठा बदल! कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांनाही होणार फायदा; वाचा सविस्तर

EPFO New Rule: ईपीएफओने EDLI योजनेच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. आता या नवीन नियमांमुळे कर्मचाऱ्यांसोबत कुटुंबालाही आर्थिक मदत मिळणार आहे.
 EPFO Rule
EPFO RuleSaam Tv
Published On

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने EPFO च्या EDLI स्कीममध्ये बदल केले आहेत. आता या योजनेचा फायदा लाखो कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे. आता EDLI म्हणजे कर्मचारी ठेवीशी संलग्न विमा योजनेच्या नियमात सवल दिली आहे. या योजनेत आता लाभ घेण्यासाठी आधीसारख्या अटी राहणार नाहीत.

 EPFO Rule
८ कोटी EPFO खातेधारकांसाठी खुशखबर, ८.२५ % व्याज जमा, तुमचा बॅलन्स कसा चेक कराल?

लाखो कर्मचाऱ्यांना फायदा

ईपीएफओच्या (EPFO) या नवीन नियमांचा लाखो कर्मचाऱ्याना फायदा होणार आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाचे नोकरीदरम्यान निधन झाले तर त्यांना या नवीन नियमांमुळे फायदा होणार आहे.यामुळे असंघटित किंवा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्याना आणि इतर कोणताही विमा संरक्षण नसलेल्या लोकांना फायदा होणार आहे.

आता जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पीएफ बॅलेन्स ५०,००० रुपयांपेक्षा कमी असेल तर त्याच्या कुटुंबाला किमान ५०,००० रुपये विम्याचालाभ मिळणार आहे. याआधी या विम्याचा लाभ घेण्यासाठी कर्माऱ्याच्या खात्यात एक ठरावीक रक्कम असणे आवश्यक होते. मात्र, आता ही अट रद्द करण्यात आली आहे.

या योजनेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.आता १२ महिन्याच्या कामाची मोजणी करताना कर्मचाऱ्यात्या दोन नोकऱ्यांमध्ये ६ दिवसांचे अंतर असेल तर त्याला ब्रेक मानता येणार नाही जर तुम्ही २-३ नोकऱ्या बदलल्या असतील आणि या काळात ६० पेक्षा कमी कालावधीचे ब्रेक घेतला असेल तर त्या सर्व नोकऱ्या एकत्रित मानल्या जातील.त्यामुळे त्यांना विम्याचा लाभ मिळणार आहे.

 EPFO Rule
EPFO Latest Update : EPFO चा नवा नियम, आता घरे खरेदी करताना काढता येणार PF चे पैसे, प्रोसेस काय? जाणून घ्या

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पीएफ योगदानाच्या शेवटच्या सहा महिन्यात मृत्यू झाला आणि हा कर्मचारी नोकरी करत असेल तर त्याच्या कुटुंबाला विमा रक्कम दिली जाईल. जर घरातील कमावत्या सदस्याचे निधन झाले तर कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करणे हा यामागचा उद्देश असेल. तसेच यासाठी त्यांना वेगळा विमा प्रिमियम भरावा लागत नाही.

 EPFO Rule
EPF Withdrawal Rule: आता फक्त १० वर्षात काढता येणार PF चे पूर्ण पैसे; EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com