Maharashtra Politics : राज्यातील या नेत्याचे मंत्रिपद जाणार, अमित शाह ७ जणांना डच्चू देणार, राऊतांच्या दाव्याने खळबळ!

Manikrao kokate viral video : मंत्री कोकाटेंचा रमी गेमचा व्हिडिओ व्हायरल; विरोधकांचा सरकारवर टीकेचा भडीमार. संजय राऊत म्हणतात, मंत्रिपद जाण्याची शक्यता.
eknath shinde devendra fadnavis ajit pawar
Maharashtra Minister Manikrao Kokate faces heat as a video of him playing rummy in Assembly goes viral. Sanjay Raut claims his cabinet exit is imminent.Saam TV News Marathi
Published On

Manikrao Kokate playing rummy in assembly viral video : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. सभागृहात रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आला अन् विरोधकांनी त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले. रोहित पवार यांनी कोकाटेंचा व्हिडिओ पोस्ट करत सरकारला सवाल उपस्थित केला होता. तर आता संजय राऊत यांनी कोकाटे यांचं मंत्रिपद जाणार असल्याचा दावा केला आहे. अमित शाह यांनी राज्यातील सहा ते सात जणांना मंत्रि‍पदामधून वगळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांचे नाव असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. (Sanjay Raut on Maharashtra cabinet reshuffle)

माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. सभागृहात रमी खेळतानाच्या घटना घडू नयेत, इथिकल कमिटीने याचा खुलासा करावा, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. कामकाज सुरू असताना रमी खेळतात, हे धन्य आहेत, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. शेतकरी आत्महत्या होत असताना हे रमी खेळताता, असे म्हणत रोहित पवार यांनी (Rohit Pawar reaction on Manikrao Kokate video) कोकाटे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. कोकाटेंचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी घणाघाती टीका केली.

eknath shinde devendra fadnavis ajit pawar
बीडमध्ये सैराट! प्रेमसंबंधावरून इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण, तरूणाचा मृत्यू
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का?
रोहित पवार, राष्ट्रवादी आमदार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com