ajit pawar plane crash : अजितदादांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा; तटकरेंची मागणी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा

NCP seeks cbi probe into ajit pawar plane crash : अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत वेगवेगळ्या शंका आणि संशय व्यक्त होत असतानाच, सुनेत्रा पवार, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख दिवंगत अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या अपघाताच्या घटनेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यासह रुपाली ठोंबरे पाटील, तसेच रोहित पवार यांनी यापूर्वीच घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. आता स्वतः सुनेत्रा पवार, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांनी या अपघाताच्या घटनेचा सीबीआयमार्फत तपास करण्यात यावा, अशी भूमिका घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले.

मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. सुनेत्रा पवार, मी स्वतः, तसेच प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, हसन मुश्रीफ यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अजितदादांच्या अपघाती मृत्यू संदर्भात आम्ही एक निवेदन दिले आहे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, असे निवेदनात म्हटले आहे. त्यावर उद्या केद्रीय गृहमंत्र्यांकडे राज्य सरकारकडून पत्रव्यवहार केला जाईल. ही सगळी चौकशी सीबीआयमार्फत केली जावी, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे, त्यासंदर्भात मुख्यमंत्री या नात्याने पावले उचलली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले.

या अपघाताच्या घटनेचा सखोल तपास व्हावा, जे- जे मुद्दे उपस्थित होत आहेत, त्या अनुषंगाने तपास केला जावा आणि त्याचा निष्कर्ष लवकरात लवकर देशासह राज्याच्या जनतेसमोर आणावा, ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. म्हणून आज आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि यासंदर्भात चर्चा केली, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com