सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात, मंत्री छगन भुजबळांनी व्यक्त केली इच्छा, पाहा नेमकं काय म्हणाले?

Sunetra Pawar Chief Minister Demand In Baramati Rally: बारामतीतील प्रचार सभेत अदिती तटकरे यांनी भावनिक आवाहन करत सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण करावे, अशी इच्छा व्यक्त केली.

अजितदादा हे केवळ एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे. त्यांनी या भूमीत केवळ स्वप्ने पाहिली नाहीत, तर ती सत्यात उतरवली आहेत. दादा सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले पण आता त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची वेळ आली आहे. भविष्यकाळात सुनेत्रा वहिनींनी दादांचे हे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण करावे, असे भावनिक आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी येथे केले. बारामती येथे आयोजित प्रचार सभेत अदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना त्या अत्यंत भावूक झाल्या होत्या. अदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, ज्याप्रमाणे आपण आषाढी एकादशीला वारीला जातो, त्याचप्रमाणे कोणत्याही लोकप्रतिनिधीसाठी बारामती ही विकासाची पंढरी आहे. दादांनी या मतदारसंघात अनेक स्वप्ने पाहिली आणि ती पूर्ण केली. निवडणुकीला सामोरे जाताना दादा नेहमी मारुतीरायाचे दर्शन घेऊनच कामाला सुरुवात करायचे. तसेच सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री व्हाव्यात अशी इच्छा देखील आदिती तटकरे यांनी व्यक्त केली. तसेच या विधानाला मंत्री छगन भुजबळ यांनी देखील दुजोरा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com