By-Election: बारामती पोटनिवडणुकीतील सस्पेन्स संपला; काँग्रेसच्या माघारीनंतर सुनेत्रा पवारांची आता अपक्षांशी लढत

Baramati By-Election: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असली तरी काँग्रेसच्या माघारीसाठी मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. पवारांनी कशी मध्यस्थी केली. आणि त्यानंतर काँग्रेसनं कशी माघार घेतली.पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Baramati By-Election
Sunetra Pawar gains edge in Baramati bypoll after Congress withdraws candidate following political negotiations.saam tv
Published On

अजित पवारांच्या मृत्यूनंतर बारामतीत होणाऱ्या पोटनिवडणुकीतील सस्पेन्स अखेर संपला. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरेंनी अखेर माघार घेतली. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय. मात्र बारामती पोटनिवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केलेल्या काँग्रेसनं यु-टर्न घेण्यामागे आहे पवारांची मध्यस्थी. शरद पवारांनी चक्र फिरवली.आणि अखेर काँग्रेसनं माघार घेतली. मात्र त्याआधी कशा नाट्यमय घडामोडी घडल्या? पाहूयात.

Baramati By-Election
Baramati By-Poll: बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? रोहित पवारांनी घेतली काँग्रेस नेत्याची भेट

सकाळी 8 वा.

रोहित पवारांनी सर्वोदय आश्रमात जाऊन हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली. आणि काँग्रेस उमेदवाराच्या माघारीची विनंती केली. सकाळी साडेदहा वाजता सुनेत्रा पवारांनी मल्लिकार्जून खर्गे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर साडेअकरा वाजता सुप्रिया सुळेंनी ट्वीट करुन काँग्रेस नेत्यांना आवाहन केलं.

Baramati By-Election
Maharashtra Politics: दापोलीत राजकीय भूकंप; शिंदे गटाचा दे धक्का! राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

मात्र काँग्रेस निवडणूक लढवण्यावर ठाम होती. त्यामुळे अखेर शरद पवार मैदानात उतरले.त्यांनी चक्रं फिरवली आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर हर्षवर्धन सपकाळ दुपारी 2 वाजता अजित पवारांच्या सन्मानार्थ माघार घेत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. आणि अवघी पंधरा मिनिट कमी असताना आकाश मोरेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

खरं तर बारामती पोटनिवडणुकीसाठी 53 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 30 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पवारांच्या मध्यस्थीमुळे काँग्रेसनं माघार घेतल्यानंतर आता सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे या पोटनिवडणुकीत पवार कुटुंब सुनेत्रा पवारांच्या पाठीशी ठाम उभं राहून किती लीडने विजय मिळवून देणार.याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com