Maharashtra Politics: दापोलीत राजकीय भूकंप; शिंदे गटाचा दे धक्का! राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

Konkan Politics : शिवसेना नेते रामदास कदम यांनी मोठा डाव खेळत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपमधील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
Leaders from opposition parties join Shiv Sena Shinde faction during a grand induction event in Konkan.
Leaders from opposition parties join Shiv Sena Shinde faction during a grand induction event in Konkan.
Published On
Summary
  • कोकणात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश

  • रामदास कदम यांच्या उपस्थितीत भव्य सोहळा

शिवसेनेत मोठ्या घडामोडी घडत आहेत. एका बाजुला पक्षात सक्रीय नसलेल्या पदाधिकारी आणि जनतेचं काम न करणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी केली जाणार आहे. त्याचदरम्यान शिवसेना पक्ष विस्तार करत आहे. त्याचपार्श्वभूमीवर कोकणात शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि भाजपला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेच्या या कदमामुळे दापोली विधानसभा मतदारसंघात मोठी उलथापालथ घडली आहे. खेड तालुक्यातील जामगे गावात राजकीय घडामोड झाली आहे.

Leaders from opposition parties join Shiv Sena Shinde faction during a grand induction event in Konkan.
Maharashtra Politics: शेवटी भाजपनं डाव साधला; अजित पवारांचा कट्टर समर्थक फोडला, राष्ट्रवादीचा आमदार हाती घेणार कमळ?

शिवसेना शिंदे गटाने आयोजित केलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली. या घडामोडींमुळे खेड-दापोली भागात शिंदे गटाची ताकद वाढणार असल्याची चर्चा आहे.शिवसेना नेते रामदास कदम यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात विरोधी पक्षांतील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

या पक्ष प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरण निर्माण होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड तालुकाध्यक्ष स. तु. कदम यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का असल्याची चर्चा आहे. याशिवाय दापोली येथील भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संजय सावंत, सचिन सावंत आणि आर्यन सावंत यांनीही शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केला.

यामुळे दापोली-खेड परिसरातील भाजपच्या संघटनात्मक रचनेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होतेय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांसाठी हे मोठे आव्हान मानले जात आहे.

Leaders from opposition parties join Shiv Sena Shinde faction during a grand induction event in Konkan.
Maharashtra Politics: शिंदेंच्या शिवसेनेत मोठा उलटफेर होणार; अनेकांचा पत्ता होणार कट

शिवसेनेतील अनेकांचा पत्ता कट होणार?

शिवसेना पक्षात उलटफेर केला जाणार आहे. यात अनेकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. पक्षश्रेष्ठी मंत्री आणि पदाधिकाऱ्यांच्या कामावार लक्ष ठेवणार आहेत, त्यामुळे पक्षातील नेत्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. जे नेते जनतेचं काम करत नाहीत त्यांची थेट हाकलपट्टी केली जाणार आहे, याची माहिती उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

पक्षप्रमुख एकनाथ शिंदे शिवसेनेत मोठे संघटनात्मक बदल करणार आहेत. निष्क्रीय आणि काम नं करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना थेट पदावरून हटवलं जाणार आहे. राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे प्रगती पुस्तक तयार केले जाणार आहे. येत्या 15 दिवसात पक्षात बदल केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com