Maharashtra Politics: शिंदेंच्या शिवसेनेत मोठा उलटफेर होणार; अनेकांचा पत्ता होणार कट

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मोठा फेरबदल होणार आहे. महत्त्वाच्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेतृत्व कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे.
Maharashtra Politics:
Eknath Shinde-led Shiv Sena likely to witness major internal changes amid rising political activity.
Published On
Summary
  • शिंदे गटाच्या शिवसेनेत मोठ्या बदलांची शक्यता

  • अनेक नेत्यांचा पत्ता कट होण्याची चर्चा

  • पक्षश्रेष्ठींकडून कामगिरीचा आढावा सुरू

बारामती विधानसभा आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांमुळे राजकीय वातवारण तापले आहे. त्याचदरम्यान एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत मोठ्या घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच संपर्कप्रमुखांच्या नावांची घोषणा केली होती, आता पक्षात उलटफेर केला जाणार आहे. यात अनेकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. पक्षश्रेष्ठी मंत्री आणि पदाधिकाऱ्याच्या कामावार लक्ष ठेवणार आहे, त्यामुळे पक्षातील नेत्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.

Maharashtra Politics:
Maharashtra Politics: शेवटी भाजपनं डाव साधला; अजित पवारांचा कट्टर समर्थक फोडला, राष्ट्रवादीचा आमदार हाती घेणार कमळ?

एकनाथ शिंदे शिवसेनेत मोठे संघटनात्मक बदल करणार आहेत.निष्क्रीय आणि काम नं करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना थेट पदावरून हटवलं जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच प्रगती पुस्तक 15 दिवसात तयार करण्यात येणार आहे. सर्व मंत्र्यांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवलं जातंय. याबाबत माहिती देताना मंत्री उदय सामंत म्हणाले, आम्हाला आज सर्व आमदार खासदार यांना मार्गदर्शन केले.

Maharashtra Politics:
विधान परिषदेच्या निवडणुकीआधी शिवसेनेत मोठी उलथापालथ; एकनाथ शिंदे पक्षात भाकरी फिरवणार

शिंदेसाहेब कायम ऍक्टिव मोडवर असतात. आता संपर्क प्रमुख निवडले आहेत. काय काम केली याचा आढावा घेतला. आता लोकसभा नाही तर तालुका आणि गाव स्तरावर नेत्यांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. जे काम करत नाही, नुसती पद घेतली आहेत अश्याना बाजूला करून नव्याना संधी देतील. 11 तारखेपासून महाराष्ट्र दौरा केला जाणार आहे. प्रगती पुस्तक काही दिवसात येईल. निवडणुकीत यश मिळालं नाही, अशांना साहेब थांबवतील. माझंदेखील काम बघितलं जाणार आहे, असं सामंत म्हणालेत.

निवडणुका संपल्यात आता पक्ष वाढीचा हंगाम सुरु झालाय. राज्यात शिवसेनेला बळकट करण्यासाठी तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचा, जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेनं काम करा आणि पक्षवाढीसाठी योगदान देण्याचे निर्देश शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदार, विभागीय संपर्कप्रमुख, सह संपर्कप्रमुख तसेच लोकसभा संपर्कप्रमुखांना दिले. मतदार याद्यांचे बारकाईने पुनरावलोकन करण्यासाठी बूथ प्रतिनिधींची नियुक्ती करा, काम दिसले नाही तर पद राहणार नाही, अशी तंबीच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिली.

नुकताच शिवसेनेकडून संपर्कप्रमुख, विभागीय संपर्कप्रमुख आणि लोकसभा संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची महत्त्वपूर्ण ऑनलाईन आढावा व मार्गदर्शन बैठक उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री, आमदार, खासदार यांना पद विसरुन कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करण्याचे निर्देश दिले. मतदार संघांच्या विभाजनानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संपर्क प्रमुखांना कामाचा रोडमॅप दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com