विधान परिषदेच्या निवडणुकीआधी शिवसेनेत मोठी उलथापालथ; एकनाथ शिंदे पक्षात भाकरी फिरवणार

Shiv Sena Reshuffle: विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे शिवसेनेत मोठा फेरबदल करणार आहेत. प्रमुख नेत्यांना नवीन जबाबदाऱ्या देणार आहेत.
Shiv Sena Reshuffle:
Eknath Shinde prepares for major Shiv Sena reshuffle ahead of upcoming elections.saam tv
Published On
Summary
  • पक्षात मोठी उलथापालथ होणार असून अनेक नेत्यांना नव्या जबाबदाऱ्या दिल्या जाणार

  • राजकारणात नवी समीकरणं तयार होणार

  • शिवसेनेत मोठी उलथापालथ केली जाणार

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला घवघवीत यश मिळाले. जिल्हा परिषदेसह अनेक महानगरपालिकेत शिवसेनेनं सत्ता मिळवली. आता आगामी काळात विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत, त्याआधी पक्षात मोठे बदल केले जाणार आहेत. शिवसेनेत मोठी उलथापालथ केली जाणार असून एकनाथ शिंदेंनी आजी-माजी आमदार, खासदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत.

Shiv Sena Reshuffle:
Ashok Kharat: खरात प्रकरणामुळे अजित पवार गटातील आणखी एक महिला नेत्या विरोधकांच्या रडारवर; राजीनाम्याची केली मागणी

शिवसेनेकडून लोकसभा संपर्क प्रमुख आणि विभागीय संपर्क प्रमुख व सह संपर्क प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तर अत्यंत महत्वाच्या असलेल्या मुंबई व ठाण्याची लोकसभेची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. मुंबईत त्यांच्यासोबत मंत्री योगेश कदम, माजी खासदार राहुल शेवाळे व आमदार निलेश राणे हेही जबाबदारी संभाळणार आहेत.

Shiv Sena Reshuffle:
Ashok Kharat Case: मोबाईलमध्ये सापडली नेत्यांची नावं; पेन ड्राईव्ह बाहेर आला तर सरकार येणार गोत्यात? काँग्रेस नेत्याच्या दाव्यानं खळबळ

दुसरीकडे मंत्री उदय सामंत यांच्याकडे पुण्यासह मावळ आणि कोल्हापूरचे लोकसभा संपर्कप्रमुखाची जबाबदारी असणार आहे. खासदार नरेश म्हस्के यांना भिवंडी आणि कल्याणचे संपर्कप्रमुख करण्यात आले आहे. राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांच्याकडे शिर्डी मतदारसंघाची जबाबदारी आहे. तेथे शिवसेनाची मोर्चबांधणी, पक्षाला बळकटी देण्याचं काम त्यांच्याकडे असणार आहे. राजन साळवी यांच्यावरही अकोल्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

विभागीय संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या

दक्षिण कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क प्रमुख किरण सामंत असणार आहेत. मंत्री भरत गोगावले यांच्याकडे उत्तर कोकण विभागातील रायगड आणि पालघर जिल्ह्याची जबाबदारी असणार आहे. माजी आमदार दगडू सपकाळ यांच्याकडे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरची जबाबदारी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com