Baramati By-Poll: बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? रोहित पवारांनी घेतली काँग्रेस नेत्याची भेट

Rohit Pawar meets Congress leader: रोहित पवार यांनी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. त्यांनी बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. आता काँग्रेस काय निर्णय घेतेय याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुंबईत भेट घेतली. नाना चौकातील सर्वोदय आश्रमात ही भेट झाली. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती रोहित पवारांनी केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता काँग्रेसकडून काय निर्णय घेतला जातोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्याकडून देखील बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुनेत्रा पवार यांनी बुधवारी रात्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे काँग्रेसने निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती केली. आता काँग्रेस उमेदवार आकाश मोरे हे उमेदवारी अर्ज मागे घेतात का? हे पाहणे महत्वाचे राहिल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com