गॉगलचे राजकारण सोलापुरातून संपलं; मंत्री जय कुमार गोरेंची मार्मिक टीका|VIDEO

Solapur MLC Election Result 2026 Analysis: सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली.

सोलापूर: स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र राऊत यांचा विजय झाला, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वसंत देशमुख यांचा पराभव झाला. पालकमंत्री जय कुमार गोरे यांच्याकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र वसंत देशमुख यांनी खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. महायुती आणि महाविकास आघाडी या लढतीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीचे वसंत देशमुख यांना फक्त 118 मतं पडली आहेत. महायुतीच्या विजयानंतर पालकमंत्री जय कुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांचे नाव न घेता, अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. सोलापुरात गॉगलचे राजकारण संपले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com