जळगाव जिल्ह्यात २१६ कोटींचा केळी पीक विमा घोटाळा उघड झालाय. तब्बल 216 कोटींवर डल्ला मारण्याचा डाव सॅटेलाईटच्या मदतीनं उधळून लावलाय. पीक नसतानाही विमा घेण्यासाठी हजारो बनावट अर्ज दाखल करण्यात आले. कृषी विभागानं सॅटेलाईटद्वारे तपासणी केली असता 44 हजार हेक्टरवर केळीचं पीक आढळलंच नाही. या कारवाईमुळे सरकारचे कोट्यवधी रुपये वाचले असून बनावट शेतकऱ्यांचे धाबे दणाणलेत.
फळपीक विमा योजनेच्या अंबिया बहर हंगामात यंदा केली उत्पादक जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 27 हजारांहून अधिक अर्ज आल्यानंतर संशयास्पद क्षेत्राची उपग्रहाच्या साह्याने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 44 हजार हेक्टरवर केळी पीकच आढळलेले नाही. या बनावट अर्जदारांचे विमा हप्त्यापोटीचे 37 कोटी 43 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. तर राज्यसरकारचे 123 कोटी 53 लाख आणि केंद्राचे 93 58 लाख रुपये वाचले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.