ठरलं! राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, महाराष्ट्राच्या राजकारणात नवं समीकरण?

Raj and Uddhav Thackeray : राज आणि उद्धव ठाकरे ५ जुलैला वरळीत एकत्र मंचावर येणार आहेत. हिंदी सक्तीविरोधातील विजय साजरा करण्यासाठी ‘मराठी विजय दिवस’ म्हणून भव्य मेळावा होणार आहे. मराठी अस्मिता आणि एकजुटीचे हे प्रतीक ठरणार आहे.

Raj Thackeray and Uddhav Thackeray : हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन ५ जुलैला विजयी मेळावा घेणार आहेत.. मराठीद्रोहींचा फणा दाबल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली...तसेच हा मेळावा मराठी माणसांच्या एकजुटीचा आणि विजयाचा उत्सव असणार असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय..

ठाकरेंचा ५ जुलै २०२५ रोजी वरळीत 'मराठी विजय दिवस' साजरा होणार आहे. मराठी माणसाच्या एकजुटीचे दर्शन घडवण्यासाठी हा भव्य मेळावा आयोजित करण्यात येत असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आलेय. मराठीद्रोह्यांनी पुन्हा डोके वर काढू नये, यासाठी एकजुटीची गरज असल्याचे मत या मेळाव्याच्या नियोजनातून व्यक्त होत आहे. हिंदी सक्तीविरोधात मराठी माणसाने पुकारलेल्या एल्गारामुळे सरकारला शासकीय आदेश मागे घ्यावा लागला, हा विजय साजरा करण्यासाठी हा मेळावा आहे. वरळीतील या मेळाव्याची तयारी जोरात सुरू असून, बैठका आणि नियोजनाला वेग आला आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचा जागर करण्यासाठी हजारो मराठी बांधव एकत्र येणार आहेत. हा मेळावा मराठी एकजुटीचे प्रतीक ठरेल, अशी अपेक्षा आहे. मराठी माणसाच्या या लढ्याला बळ देण्यासाठी सर्वांनी वरळीत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com