नाशिकच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी अनेक दावेदार होते. त्यामध्ये नवे आणि जुने अशा दोन्ही प्रकारचे अनेक दावेदार होते. प्रदेश पक्षनेत्यांकडून जी जावे निश्चित झाली, ती डावलून दुसरीच नावे घोषित केल्यामुळे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपाच्या वादातून देखील अनेकदा मोठा गोंधळ झाला होता. यामुळे त्यांना मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते. निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना उमेदवारी दिल्याने नाशिकच्या भाजप कार्यालायाबाहेर मोठा राडा ही झाला होता. दस्तूरखुद्द मंत्री गिरीश महाजन यांना ही कार्यकर्त्यांच्या जमावाने वेढा घातल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान काल हिमगौरी आडके महापौर आणि उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांचे नाव घोषित करण्यात आले आणि सुनील केदार हे नाराज झाले.
मंत्री गिरीश महाजन यांनी दुपारी 2 वाजेच्या सुमारास उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर केदार हे नाराज झाले. मागच्या 41 वर्षांपासून पक्ष संघटनेत आपण काम करत आहोत. मात्र पक्षश्रेष्ठींकडून निश्चित झाल्याचा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचा दावा केदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पाठवलेल्या पत्रात केल्याचे सूत्रांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.