Pahalgam Attack: 2 मिनिटांत तयार व्हा! पाहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून हवाई दलाला आदेश|VIDEO

India-Pakistan Border Heats Up: भारत पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाची परिस्थिति निर्माण झाल्यामुळे दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणात युद्धसराव सुरू असल्याचे दिसून येत आहे.

भारताचे नंदनवन असलेले जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पोलीस वेशात येऊन 28 निर्दोष लोकांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. यानंतर सर्वत्र संतापाची लाट उफाळली असून भारतीय लष्कर हे सज्ज झाले आहे. पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यात बैठकींचे सत्र सुरू आहे.

काल फ्रांस आणि भारतामध्ये राफेल खरेदीसाठी 63000 हजार कोटींचा करार झाला. यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या सीमेवर हालचाली वाढल्याने भारतीय हवाई दलाला दोन मिनिटांच्या आत कारवाईसाठी सज्ज होण्याचे आदेश देण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाची परिस्थिति निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानकडून नियंत्रन रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अधिक संख्येने तोफा आणण्यात आल्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com