"ओमराजे परत जा!" MPSC आंदोलनात शिंदेंच्या खासदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी, वातावरण तापले

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट दिली; मात्र भाषणाला उभे राहताच विद्यार्थ्यांनी 'गो बॅक'च्या घोषणा देत तीव्र विरोध केला. MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन ओमराजेंनी दिले.

शिंदेसेेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अहिल्या अभ्यासिका येथे सुरू असणाऱ्या एमपीएससी आंदोलन विद्यार्थ्यांची भेट घेतली...यावेळी आंदोलकांनी ओमराजेंविरोधात घोषणाबाजी केली...

पुण्यात विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अहिल्या अभ्यासिका येथे भेट दिली. मात्र, ते आंदोलनस्थळी पोहोचून भाषणाला उभे राहताच संतप्त विद्यार्थ्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली. 'गो बॅक'च्या (Go Back) घोषणा देत विद्यार्थ्यांनी त्यांना विरोध दर्शवला.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी आंदोलनस्थळी भेट दिली. "तुमची परीक्षा आयुष्यभराची आहे, तर आमची निवडणूक ५ वर्षांची आहे. तुमच्या यातना आमच्यापेक्षा खूप जास्त आहेत आणि मला तुमच्या मागण्या मान्य आहेत," असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com