रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बंधनकारकच; मुदतवाढ उद्यावर; परिवहन मंत्र्यांची ठाम भूमिका

Marathi Compulsory For Auto And Taxi Drivers In Maharashtra: महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा बंधनकारक करण्यात आली आहे. १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची केल्याच्या निर्णयाविरोधात राज्यातील चालक संघटनांनी 4 मेपासून संपाचा इशारा दिला होता. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मेपासून मराठी भाषा लिहिणे, वाचणे आणि बोलणे बंधणकारक करण्यात आले आहे.

रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय लागू करण्यापूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत कामगार नेते शशांक राव आणि शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटना उपस्थित होत्या. यानंतर प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भात सविस्तर माहिती दिली. अनेक संघटनांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्रात टॅक्सी, रिक्षा चालवायची असेल तर मराठी बोलणं आवश्यक आहे. हे सगळ्यांनी मान्य केले. सगळ्या संघटनांच्या लोकांनी सांगितले की, आम्ही जमेल तशा मराठी शिकवण्या घेऊ. त्यासाठी सगळ्यांनी मुदत मागितली.

3 महिने, 6 महिने, तर काही जणांनी वर्षभराची मुदत मागितली. यावेळी मुदतवाढी संदर्भात मी त्यांना कुठलाही शब्द दिलेला नाही. उद्या आरटीओची सकाळी 10.30 वाजता बैठक बोलवली आहे. त्यांच्यासोबत चर्चा करू. मुदत हवी असेल तर मुदत देण्याचा आम्ही विचार करू. मात्र त्यांची मुजोरी चालणार नाही. मुदतवाढ देण्याची आमची तयारी आहे. मात्र अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही, असे प्रताप सरनाईक म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com