राज्यकर्ते गावात आल्यावर त्यांना रट्टे...; मनोज जरांगेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल, काय म्हणाले? VIDEO

Manoj Jarange Speech At Shivneri Fort On Shiv Jayanti: शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी जयंतीनिमित्त मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा, शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीवरून राज्यकर्त्यांवर तीव्र टीका करत मोठे वक्तव्य केले.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रसह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या निमित्ताने दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यासाठी कालपासूनच शिवप्रेमी दाखल झाले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील शिवनेरी किल्ल्यावर जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हे आजचे राज्यकर्ते आहे का? यांना रट्टे दिले पाहिजे. सरकारकडून अरबी समुद्रात शिवाजी महाराज यांचा पुतळा झाला नाही, आणि इथे येऊन आरती करतात. राज्यातला शेतकरी फाशी घ्यायला लागला आहे. यांच्याकडून कर्जमाफी होत नाहीये. पण एक दिवस गोरगरीब जनतेचा चांगला दिवस उगणार म्हणजे उगणार असा विश्वास त्यांनी व्यक्त करत सरकारकडून कुठलीही अपेक्षा नाहीये असे म्हणाले. तसेच राज्यकर्ते गावात आल्यावर त्यांना रट्टे दिले पाहिजे आणि गोट्याने हाणले पाहिजे असा जोरदार प्रहार जरांगे पाटील यांनी सरकारवर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com