मराठ्यांचं वादळ आता दिल्लीला धडकणार; मनोज जरांगे महायुती सरकारचं टेन्शन वाढवणार?

Maratha Reservation : मुंबईनंतर आता मराठ्यांचं वादळ राजधानी दिल्लीला धडकणार आहे. यामुळे महायुती सरकारचं टेन्शन वाढणार आहे.
maratha andolan
Maratha Reservation Saam tv
Published On
Summary

मराठा समाजाचे मोठे अधिवेशन आता दिल्लीमध्ये होणार

राज्यभरातून मराठा समाज दिल्लीत एकत्र येण्याची शक्यता आहे

मनोज जरांगे यांचा महायुतीतील धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप

कुणबी नोंदी शोधण्यास प्रशासन अडथळे निर्माण करत असल्याचे जरांगे यांनी सांगितले

विकास मिरगणे, साम टीव्ही

मराठा समाजाचं राज्यव्यापी अधिवेशन दिल्लीला होणार आहे. राज्यभरातून मराठा समाज दिल्लीत एकत्र येणार आहे. मराठ्यांचं वादळ आता मुंबईनंतर राजधानी दिल्लीला धडकणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

maratha andolan
'इंडिगो'चा गोंधळ, नागपूरचे अधिवेशन अन् आमदारांचा १२ तास 'बाय रोड' प्रवासाचा आटापिटा

मनोज जरांगे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. धनंजय मुंडे यांची चौकशी करावी. अजित पवारांनी पक्ष वाढवावा, मात्र असे लोक सोबत ठेवू नयेत, अशी मागणी जरांगे यांनी केली. दुसरीकडे छगन भुजबळ यांनी सारथी संस्थेच्या अनेक योजना बंद केल्या, असा आरोपही जरांगेंकडून करण्यात आला.

मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणावरून आरोप करत म्हटलं की, कुणबी नोंदी शोधण्यापासून रोखली जात आहे. मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्रमध्ये नोंदी शोधत नाहीत. प्रमाणपत्र दिले जात नाही. काही अधिकारी अडथळा करीत आहेत.सातारा , पुणे , औंध संस्थानचा जीआर तातडीने काढा'.

maratha andolan
...तर त्या पक्षाचा सत्यानाश होतो; केंद्रीय मंत्री आठवलेंनी सांगितला ३५ वर्षांचा इतिहास

मुंडेंच्या घातपाताच्या सुपारीच्या आरोपावरही जरांगे यांनी भाष्य केलं. 'मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. अजित पवार यांच्या पक्षाला आता त्यांच्यामुळे उतरली कळा लागेल. नरेंद्र पाटील यांनी छगन भुजबळांचे नाव घेतले. भुजबळ यांनी सांगितल्याने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अनेक योजना बंद केल्या आहेत. मग उद्योजक कसे होतील. व्यावसायिक तरुण अडचणीत आले आहेत'.

maratha andolan
Nashik Accident : सप्तश्रृंगी गडावरून कार दरीत कोसळली, ६ भाविकांचा मृत्यू

'हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करा. मला पश्चिम महाराष्ट्रातील चारही गॅझेटचा जीआर पाहिजे. शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती केली नाही. त्यामुळे बँका मागे लागत आहेत. जूनच्या कर्ज मुक्तीचा जीआर आजच्या अधिवेशनात काढा. कर्ज माफी होत असली, तरी आताही त्यांना कर्ज द्या. २०२९ ला महायुतीला मोठा फटका बसणार आहे. कारण घातपात करणाऱ्या लोकांना हे पाठीशी घालत आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com