Ajit Pawar: अजित पवारांना धमकावून शरद पवारांचा पक्ष सोडण्यास भाग पाडले, ठाकरेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Sanjay Raut On Ajit Pawar Death: अजितदादांना धमक्या देऊन महायुतीत आणलं, असे म्हणत संजय राऊत यांनी पीएम मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुतीत सहभागी होण्यासाठी ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईची भीती दाखवण्यात आली होती, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत पीएम मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले,'नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनीच अजित पवार यांना बदनाम करण्यासाठी मोठी मोहीम चालवली होती. भ्रष्टाचारी अजित पवार,७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा, अशा आरोपांचा सातत्याने प्रचार केला गेला. अजित पवार यांना अशा पद्धतीने त्रास देण्यात आला की, कोणत्याही क्षणी तुम्हाला अटक होऊ शकते, तुमच्या घरी तपास यंत्रणा पोहोचतील, अशी भीती दाखवून त्यांना धमकावण्यात आले. त्यांना घाबरवून आणि दबाव टाकून शरद पवार यांचा पक्ष सोडण्यास भाग पाडले.' तसंच, 'ज्या लोकांनी अजित पवार यांच्यावर आरोप केले त्यांच्याच हस्ते काल त्यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. काल हेच लोक अजित पवार यांच्या नावाने अश्रू ढाळत होते आणि मैत्रीचे गुणगान गात होते.', अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.