Maharashtra Politics: मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो, राज्याच्या राजकारणात नेमकं घडतंय काय?VIDEO

Why is Ajit Pawar on MNS banner: मनसेने दादरमधील बॅनरवर अजित पवारांचा फोटो लावल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. पहिलीपासून मराठी सक्ती नको, या पवारांच्या भूमिकेवर मनसेकडून टीका करण्यात आली असून हे पोस्टर चर्चेचा विषय ठरले आहे.

सध्या राज्यात मराठी हिंदी भाषेवरून मोठा वाद सुरू आहे. मनसेने सुरुवातीपासून याला कडाडून विरोध केल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आज मुंबईतील दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पर्कात मनसेच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या आहेत. अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी पहिलीपासून मराठी भाषेची सक्ती नको, पाचवीपासून हिंदी भाषा असायला पाहिजे अशी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. त्याच व्यक्तव्याला दुजोरा देत या बॅनरद्वारे सरकारवर मनसेकडून ताशेरे ओढण्यात आले आहे. मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी लावलेल्या बॅनरची सध्या दादरमध्ये चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com