
पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून २२ जून रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगलीच कंबर कसल्याचं दिसतंय. त्याचवेळी त्यांचे विरोधक आणि सहकार बचाव पॅनलचे प्रमुख चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधलेला आहे. उपमुख्यमंत्री मीच, आमदार मीच, सगळं मीच...अरे चाललंय काय? असा प्रश्न तावरेंनी विचारला. अजित पवारांची 'एक ना धड भाराभर चिंध्या' अशी अवस्था झाल्याची टीकाही त्यांनी केली.
'मीच करू शकतो असं आम्ही कधीच म्हणालो नाही आणि म्हणणारही नाही. आमचं आणि अजित पवारांचं वैचारिक भांडण आहे. उपमुख्यमंत्री तेच, मंत्री तेच, आमदार तेच, सगळंच त्यांना पाहिजे', असं म्हणत चंद्रराव तावरेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
चंद्रराव तावरे म्हणाले की, 'गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मी हे करू, ते करू सांगत आहेत. पण अजित पवार फक्त बोलतात, काही करत नाही,' असा खोचक टोला चंद्रराव तावरे यांनी लगावला. 'आमच्याकडे २१च्या २१ उमेदवार हे चेअरमन पदाच्या पात्रतेचे आहेत. अजित पवारांच्या पॅनलमध्ये चेअरमन होणारं दुसरं कुणी आहे का? ते सांगावं.'
'माळेगाव सहकारी साखर कारखान्याची साखर भिजली आहे. पण अजित पवार खोटं बोलत आहेत. जो आमच्या हिताच्या आड येईल त्याला आम्ही आडवा करू.' अजित पवार हे खाजगीकरणालाच बळ देतात. अजित पवार सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊ शकत नाहीत.' असंही तावरे म्हणाले.
दरम्यान, माळेगाव साखरकारखाना निवडणुकीसाठी २२ जून रोजी मतदान होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नीळकंठेश्वर पॅनेल, ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या पक्षाचे बळीराजा सहकार बचाव पॅनेल, चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनेल, असे चार पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.