Uddhav Thackeray: हातात कटोरा घेऊन युतीची भीक मागताय; एकेकाळाच्या ज्येष्ठ सहकारी नेत्याची उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका

Ramdas Kadam On Uddhav Thackeray Speech: रामदास कदमांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यतेवरून हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे युतीची भीक मागत असल्याची टीका रामदास कदम यांनी केलीय.
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam On Uddhav Thackeray SpeechSaam tv
Published On

शिवसेनेच्या वर्धापन दिनी भाषण करताना उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात महायुतीच्या नेत्यांचा समाचार घेतला. त्याचवेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाशी युती करणार असल्याचे संकेत दिले. राज्याच्या मनात जे आहे तेच करणार असं म्हणत उद्धव ठाकरेंनी युतीबाबत सकारात्मक भाष्य केलं. त्यावर शिंदे सेनेकडून प्रतिक्रिया दिली जात आहे. शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.

उद्धव ठाकरे हे मेले नाहीत जिवंत आहेत, त्या अनुषंगाने कालचे त्यांचं भाषण होत, अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिलीय. आधी हे उद्धव ठाकरे मला गाडीत घेतल्या शिवाय मातोश्रीबाहेर पडत नव्हते . आज ते 'कमऑन किल मी', ॲम्ब्युलन्स घेऊन या? असं बोलतात. हे बोलण्याची तुमची कुवत आणि धमक आहे का? आता कोण रामदास कदम तुमच्यासोबत आहे? असा सवाल करत कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला.

मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला इशारा दिला. आता इतका उत्साह कसा आला. इतक्या वर्षात युतीचं कधीच सुचले नाही असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी युतीवरुन उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरे हातात भीकेचा कटोरा घेऊन राज ठाकरेंकडे युतीची भीक मागतायत. बाबा मला युतीची भीक दे, असं म्हणत असल्याचे रामदास कदम म्हणाले.

Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Raj-Uddhav Thackeray Yuti: राज- उद्धव ठाकरेंच्या युतीला ब्रेक? मनसे नेत्याच्या विधानानंतर चर्चेला उधाण

एक म्यान में दो तलवारे नहीं होती

युतीसाठी आपण एकदा बाळा नांदगावकर यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा उद्धव ठाकरेंनी प्रस्ताव नाकारला होता. एक म्यान में दो तलवारे नहीं होती. तेव्हा राज ठाकरे यांना सोबत घेतलं नाही आणि आता भीक मागत आहेत. तेव्हा राज ठाकरे काय मागत होते? फक्त पुणे आणि नाशिक. मात्र तेही उद्धव ठाकरेंनी दिले नाही. आज मुंबई पाहापलिकेसाठी ते युती करा म्हणत आहेत.

Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Raj-Uddhav Thackeray Yuti: राज- उद्धव ठाकरेंच्या युतीला ब्रेक? मनसे नेत्याच्या विधानानंतर चर्चेला उधाण

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर राज ठाकरे यांचे मोठे नुकसान होईल. मराठी माणसाला तुम्ही मुंबईतून बाहेर काढले आणि आता त्यांच्यासाठी तुम्ही एकत्र येणार म्हणताय का? तुम्ही मराठी माणूस संपवल्याची टीका कदमांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com