विधानसभेत मोठा राडा! शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप; आव्हाडांकडून दिलगिरी, निलंबनाची मागणी; नेमकं काय घडलं? VIDEO

Chaos in Maharashtra Assembly Over Religion Freedom Bill: विधानसभेत धर्म स्वातंत्र्य विधेयकावर चर्चा सुरू असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून शुक्रवारी गृहराज्यमंत्री पंकज भोईर यांच्याकडून विधानसभेत धर्म स्वातंत्र्य विधेयक मांडण्यात आले. या विधेयकाला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील पाठिंबा दिला असून भास्कर जाधव यांनी याबाबत सभागृहात भूमिका मांडली. या विधेयकावर चर्चा सुरू असताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शविला. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप शिवसेना आणि भाजप नेत्यांनी केला. त्यानंतर सत्ताधारी गट चांगलाच आक्रमक झाला. मंत्री दादा भुसे यांनी आव्हाड यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच त्यांच्या निलंबनाची मागणी केली. यावेळी मंत्री नितेश राणे हे देखील चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. जितेंद्र आव्हाड यांचे तात्काळ निलंबन करा अशी मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली. त्यानंतर आव्हाड यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com