Jat Robbery : जतमध्ये मध्यरात्री दरोडा, व्यापाऱ्यांना लुटलं; २० लाख कॅश, २ तोळं सोनं घेऊन फरार

Sangli Jat robbery 20 lakh cash and gold : सांगलीच्या जतमध्ये तामिळनाडूच्या व्यापाऱ्यांना लुटलं. बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील २० लाखांची रोकड, दोन तोळे सोने घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला. भीवर्गी फाट्यावर मध्यरात्री थरारक घटना घडली.

विजय पाटील, सांगली | साम टीव्ही

Jat midnight robbery latest crime news : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असलेल्या उमदीजवळील भीवर्गी फाटा येथे तामिळनाडूमधून माडग्याळमध्ये मेंढ्यांच्या बाजारात व्यापारासाठी निघालेल्या व्यापाऱ्यांना लुटल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली.

जीपमधून आलेल्या सहा ते आठ दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून दहा व्यापाऱ्यांकडील २० लाखांची रोकड, दोन तोळे सोने आणि मोबाइल असा सुमारे ३० लाखांचा मुद्देमाल लुटून पोबारा केला. मध्यरात्री घडलेल्या दरोड्याच्या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला. संशयितांच्या शोधासाठी उमदी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके रवाना केल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com