देशावर मोठं संकट! होर्मुझ सामुद्रधुनीत 22 भारतीय जहाजं अडकली|VIDEO

22 Indian Ships Stuck In Hormuz Strait Latest News: होर्मुझ सामुद्रधुनीत 22 भारतीय जहाजं अडकली असून 611 भारतीय नाविक अडचणीत आहेत. इराण-इस्रायल आणि अमेरिकेतील वाढत्या संघर्षामुळे जागतिक शिपिंग आणि एलपीजी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.

इराण-इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. युद्धाचा आज 18 वा दिवस असून यामुळे जगावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. या युद्धाची झळ फक्त या तिन्ही देशांपुरती नसून संपूर्ण जगाला परिणाम भोगावे लागत आहे. जगाला सर्वाधिक फटका स्ट्रेट ऑफ होर्मुज म्हणजेच होर्मुजची सामुद्रधुनी बंद केल्याने एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. या दरम्यान शिपिंग मंत्रालयाने महत्वाची माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या पोर्ट्स शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश सिन्हा यांनी या संदर्भातील महत्त्वाची माहिती दिलीय. या 22 जहाजांवर एकूण 611 भारतीय नाविक असल्याची अधिकृत पुष्टीही त्यांनी केलीय. त्यामुळे मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या भारतीय नाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com