Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलचा क्रिकेट टीमला अलविदा, पोस्ट पाहून चाहते संभ्रमात

Yuzvendra Chahal latest news: युजवेंद्र चहलने नॉर्थम्प्टनशरसह तीन वर्षांचा काउंटी क्रिकेट प्रवास संपवला. लॉर्ड्सवरील सामन्यानंतर त्याने भावनिक पोस्ट करत क्लबचे आभार मानले. ‘द लास्ट डान्स’ पोस्टमुळे सुरू झालेल्या निवृत्तीच्या चर्चेबाबत नेमकं काय आहे ते जाणून घेऊया.
Yuzvendra Chahal
Yuzvendra Chahalsaam tv
Published On: 

भारतीय लेगस्पिनर युजवेंद्र चहल याने इंग्लिश काउंटी क्रिकेट क्लब नॉर्थम्प्टनशरसोबतचा तीन वर्षांचा प्रवास संपवला आहे. 2026 काउंटी चॅम्पियनशिपमधील आपला शेवटचा सामना त्याने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर मिडलसेक्सविरुद्ध खेळला. हा सामना संपल्यानंतर चहलने सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट करत नॉर्थम्प्टनशरसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

'हा क्लब नेहमीच माझ्या मनाजवळ राहील'

चहलने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर नॉर्थम्प्टनशरला निरोप देताना इमोशनल मेसेज लिहिलाय. भारतापासून हजारो मैल दूर असूनही क्लब, टीममधील खेळाडू आणि मॅनेजमेंटकडून मिळालेल्या सततच्या पाठिंब्यामुळे कधीही घरापासून दूर असल्यासारखं वाटलं नाही, असं चहलने म्हटलंय.

Yuzvendra Chahal
Rohit Sharma: रोहित शर्मा बसमधून उतरताना पडला; विराट कोहलीची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO

नॉर्थम्प्टनशरचा भाग होण्याचा मला अभिमान असल्याचंही त्याने सांगितलंय. या क्लबसोबत एकत्र खेळलेला चांगला क्रिकेटचा प्रवास आणि मिळालेल्या प्रेमासाठी चहलने क्लबचे आभार मानलेत.

चहलच्या संन्यासाची चर्चा का सुरू झाली?

काही दिवसांपूर्वी चहलने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवरून काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंना त्याने 'द लास्ट डान्स' असं कॅप्शन दिलं होतं. त्यामुळे चहल आता क्रिकेटमधून निवृत्ती घेणार का, अशी चर्चा सुरू झाली होती.

Yuzvendra Chahal
Virat Kohli: भर मैदानात ट्रेविस हेडशी भिडला विराट कोहली; सामन्यानंतर हँडशेक करणंही टाळलं, नेमकं काय घडलं, VIDEO

मात्र आता नॉर्थम्प्टनशरला दिलेल्या निरोपाच्या पोस्टमुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. चहलचा हा मेसेज केवळ नॉर्थम्प्टनशरसोबतचा तीन वर्षांचा प्रवास संपल्याबद्दल होता. त्याने स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली नाही.

टीम इंडियापासून बराच काळ दूर

चहल सध्या टीम इंडियाचा भाग नाही. मात्र टीम इंडियापासून दूर असूनही त्याने देशांतर्गत क्रिकेट आणि परदेशातील लीगमध्ये आपली फिरकी कायम ठेवली आहे. 2026 च्या काउंटी सिझनमध्ये नॉर्थम्प्टनशरकडून खेळताना चहलने चांगली कामगिरी केली. डरहमविरुद्धच्या एका सामन्यात त्याने तब्बल 9 विकेट घेतल्या. याशिवाय वोस्टरशरविरुद्ध एका डावात 5 विकेट घेण्याची कामगिरीही त्याने केली.

Yuzvendra Chahal
Rohit Sharma: रोहित शर्मा बसमधून उतरताना पडला; विराट कोहलीची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO

नॉर्थम्प्टनशरसाठी चहल ठरला महत्त्वाचा खेळाडू

नॉर्थम्प्टनशरसह तीन वर्षांच्या काळात चहलने त्याच्या फिरकीच्या जोरावर अनेक महत्त्वाचे विकेट घेतले. तो क्लबच्या विश्वासू आणि प्रमुख परदेशी खेळाडूंमध्ये राहिला. 2026 च्या काउंटी चॅम्पियनशिपमधील अखेरचा सामना चहलने लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला. मिडलसेक्सविरुद्धचा हा सामना संपल्यानंतर त्याने नॉर्थम्प्टनशरला निरोप दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com