Rohit Sharma: रोहित शर्मा बसमधून उतरताना पडला; विराट कोहलीची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO

Rohit Sharma bus video: भारत-वेस्ट इंडिज पहिल्या वनडेनंतर हॉटेलमध्ये परतताना रोहित शर्मा बसमधून उतरताना खाली पडला. सुदैवाने त्याला दुखापत झाली नाही. रोहित पडल्याचं पाहून विराट कोहलीने दिलेली रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Rohit Sharma
Rohit Sharmasaam tv
Published On: 

टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा याच्यासोबत मोठा अपघात होता होता टळला. वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेत भारताने शानदार विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया हॉटेलकडे परतत होती. यावेळी बसमधून उतरताना रोहित शर्मा अचानक खाली पडला. सुदैवाने या घटनेत त्याला कोणतीही दुखापत झालीये. दरम्यान बसमधून आधीच खाली उतरलेल्या विराट कोहलीचा रोहितकडे पाहतानाचा रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने पहिल्या वनडेत वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतलीये. भारताच्या विजयात विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या शतकांचा मोठा वाटा राहिला. तर गोलंदाजीत कुलदीप यादवने शानदार कामगिरी करत 4 विकेट्स घेतल्या. त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.

Rohit Sharma
Ind vs Eng : दुसऱ्या वनडेत भारताचा धक्कादायक निर्णय; मॅचविनर खेळाडू संघाबाहेर; प्लेइंग ११ कशी आहे?

रोहित शर्मा बसमधून पडला खाली

रोहित शर्मा बसमधून उतरत असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रोहित बसमधून खाली उतरताना दिसतोय. बसच्या पायऱ्यांवरून उतरत असताना त्याचा पाय घसरला आणि तो थेट खाली पडला.

रोहित खाली पडताच तिथे उपस्थित असलेले काही स्टाफ मेंबर्स आणि एका पोलीस कर्मचाऱ्याने लगेच त्याच्याकडे धाव घेतली. त्यांनी रोहितला लगेच उठवलं. सुदैवाने रोहितला या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही. त्यावेळी भारतीय टीममधील काही खेळाडू बसमधून आधीच खाली उतरले होते. टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी हॉटेलमधील स्टाफही बाहेर उभा होता. टीम इंडिया हॉटेलमध्ये पोहोचताच सर्वजण टाळ्या वाजवत होते.

विराटची रिएक्शन झाली व्हायरल

याचवेळी विराट कोहलीचे लक्ष रोहित शर्माकडे गेलं. रोहित खाली पडल्याचं पाहून विराटने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. विराटचा हीच रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Rohit Sharma
Virat Kohli: 'भारतासाठी हा माझा शेवटचा वर्ल्डकप…’; विराटच्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ, रोहितनेही सांगितला प्लान

रोहितला मोठी खेळी करता आली नाही

वेस्ट इंडिजने पहिल्यांदा फलंदाजी करत भारतासमोर 296 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. या रन्सचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 12 ओव्हर्समध्ये 74 रन्सची भागीदारी केली. रोहित शर्माने सुरुवातीला चांगली फलंदाजी केली. त्याने 2 चौकार आणि 3 मोठे सिक्स लगावत 32 रन्स केले. या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात त्याला यश आलं नाही.

रोहितला अल्झारी जोसेफने बाद केलं. त्यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात आला. विराटने कर्णधार शुभमन गिलसोबत शानदार फलंदाजी करत 151 रन्सची पार्टनरशिप केली. या भागीदारीच्या जोरावर भारताने सामन्यावर पूर्णपणे पकड मिळवली.

Rohit Sharma
IND vs AFG : ज्याची भीती होती तेच घडलं! टी २० मालिकेआधी भारतीय संघाला जबरदस्त झटका

दुसरा वनडे कधी होणार?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सिरीजमधील दुसरा वनडे सामना बुधवारी 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटीमध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंजिया दुसरा सामनाही जिंकून सिरीजमध्ये आघाडी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com