Virat Kohli, Royal Challengers Bengaluru Captain: येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व फ्रेंचायझींना आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करावी लागणार आहेत. ही यादी समोर आल्यानंतर लवकरच आयपीएलच्या मेगा ऑक्शनची तारीख समोर येणार आहे.
मात्र त्यापूर्वी कोणाला संघात कायम ठेवायचं आणि कोणाला रिलीज करायचं? या प्रश्नाने संघमालक आणि टीम मॅनेजमेंटचं टेन्शन वाढवलं आहे. दरम्यान विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाबाबत एक मोठी अपडेट आहे.
विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर फाफ डू प्लेसिसची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र आता आगामी हंगामात विराट कोहली पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार होणार असल्याची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. गेल्या हंगामात फाफ डू प्लेसिस या संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता.
ईएसपीएन क्रीकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, विराटने पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार होण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. त्याने आपल्या मनतील ईच्छा टीम मॅनेजमेंटला सांगितली.
मात्र यात किती तथ्य आहे, हे अजूनही समजू शकलेलं नाही. लवकरच याबाबत अधिकृत माहीती समोर येऊ शकते. विराटला नेतृत्व करण्याचा चांगलाच अनुभव आहे. यापूर्वीही त्याने बरेच वर्ष या संघाचं नेतृत्व केलं आहे. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला एकदाही जेतेपद जिंकता आलेलं नाही.
विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळतोय. २०२१ पर्यंत त्याला या संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर ही जबाबदारी फाफ डू प्लेसिसकडे सोपवण्यात आली होती.
माध्यमातील वृत्तानुसार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ फाफ डू प्लेसिसला रिलीझ करु शकतो. त्यानंतर या संघाला कर्णधाराची गरज पडेल आणि विराट यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.