Yuzvendra Chahal: 'खरं प्रेम...', युजवेंद्र चहलच्या नव्या पोस्टने खळबळ; धनश्रीसोबत घटस्फोटांच्या कथित चर्चांना पुन्हा उधाण

Yuzvendra Chahal Sensational Post About Real Love: मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात सर्व काही ठीक नाही आणि दोघेही लवकरच घटस्फोट घेण्याचा निर्णय घेऊ शकतात.
True Love Yuzvendra Chahal
True Love Yuzvendra Chahalsaam tv
Published On

गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल खूप चर्चेत आहे. यावेळी पुन्हा एकदा तो त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा सध्या त्याच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात सर्व काही ठीक नाही आणि दोघेही लवकरच घटस्फोट घेण्याचा निर्णय घेऊ शकतात.

दरम्यान या कथित चर्चांमध्येच भारतीय फिरकीपटूने आपल्या नवीन पोस्टने खळबळ उडवून दिलीये. चहलने नव्या पोस्टमध्ये खऱ्या प्रेमाविषयी बोलून घटस्फोटाच्या बातम्यांना आणखी खतपाणी घातल्याचं बोललं जातंय.

True Love Yuzvendra Chahal
Rohit Sharma: मी प्रयत्न करेन, 140 कोटी लोकांच्या अपेक्षा...; चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्माने चाहत्यांना दिलं वचन

इन्स्टावरून फोटो काढून टाकले

युजवेंद्र चहलने पत्नी धनश्रीसोबतचे सर्व फोटो इंस्टाग्रामवरून हटवले आहेत. घटस्फोटाबाबत दोन्हीकडून अजून कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही. पण, दोघंही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना दिसतायत. नुकतीच चहलने केलेली ही पोस्ट कुठेतरी घटस्फोटाच्या बातमीला दुजोरा देतेय, असा दावा केला जातोय.

True Love Yuzvendra Chahal
Rohit Sharma: रोहित शर्मा Ranji Trophy खेळणार! सामन्याची तारीख अन् ठिकाण नोट करुन ठेवा

चहलने सोशल मीडियावर काय पोस्ट केली आहे?

युजवेंद्र चहलने इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरलीये. चहलने पोस्टमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंना कॅप्शन देताना त्याने खऱ्या प्रेमाबद्दल सांगितले. चहलने लिहिले, "खरं प्रेम दुर्मिळ आहे. हाय, माझं नाव 'rare' आहे. ( Real love is rare. Hi, my name is 'Rare' )

True Love Yuzvendra Chahal
Virat Kohli, Ranji Trophy: विराट कोहली रणजी ट्रॉफी खेळणार! पण मानेचं दुखणं असताना खेळायला तयार कसा झाला?

2020 मध्ये झालं होतं लग्न

चहल आणि धनश्री यांचं २०२० मध्ये लग्न झालं होतं. लग्नाआधी काही काळ ते एकमेकांना डेट करत होते. दोघांनी इंस्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो केल्यावर नात्यातील कटूता असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच काही दिवसांपूर्वी वेगळे झाले आहेत.

True Love Yuzvendra Chahal
Rohit Sharma: टीममध्ये असूनही रोहित शर्माकडे कॅप्टन्सी नाही; 'या' खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळणार हिटमॅन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com