
क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे तब्बल १० वर्षांनंतर रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये सहभागी होणार आहे. भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा सोमवारी जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या मुंबईच्या रणजी टीममध्येही होता. नोव्हेंबर 2015 नंतर हिटमॅन रणजी ट्रॉफी सामन्यात मुंबईसाठी ओपनिंग करताना दिसणार आहे. मात्र मुंबईच्या टीमचं नेतृत्व रोहित करणार नाही. यावेळी रोहित अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या टेस्ट सामन्यांमध्ये रोहितची कामगिरी काही फारशी चांगली झाली नाही. सततच्या खराब कामगिरीनंतर बीसीसीआयने सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणं बंधनकारक केलं आहे.
या सामन्यासाठी रोहित शर्माशिवाय भारताचा युवा ओपनर यशस्वी जयस्वालचाही टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. जयस्वालने २०२२ मध्ये शेवटचा रणजी सामना खेळला होता. दरम्यान यावेळी पृथ्वी शॉला टीममध्ये स्थान मिळालं नाही. शॉ शेवटचा मुंबईकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी फायनलमध्ये मध्य प्रदेश विरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला होता. खराब कामगिरीनंतर त्याला विजय हजारे करंडक टीममधून वगळण्यात आलं.
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैयस्वाल, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सिद्देश लाड, शिवम दुबे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), आकाश आनंद (विकेटकीपर), तनुष कोटियन, शम्स मुलानी, हिमांशु सिंह, शार्दुल ठाकुर, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा, रॉयस्टन डायस, कर्ष कोठारी.
रोहित शर्माशिवाय भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीही रणजी ट्रॉफीमध्ये कमबॅक करणार आहे. किंग कोहली 2012 नंतर प्रथमच दिल्लीसाठी रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. विराट कोहली 30 जानेवारीपासून दिल्लीत रेल्वेविरुद्धच्या एलिट ग्रुप डी सामन्यात खेळताना दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.