
क्रिकेट चाहत्यांना सध्या उत्सुकता लागलीये ती चॅम्पियन्स ट्रॉफीची. येत्या फेब्रुवारी महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. यंदाच्या वेळी पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवत आहे. यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना होणार आहे.
टीम इंडिया 20 फेब्रुवारीपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. या स्पर्धेमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना बांगलादेशशी होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा संघही जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्मा पुन्हा एकदा टीम इंडियाचे कर्णधारपदासाठी सज्ज झाला आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, अजिंक्य रहाणे आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, आयसीसी स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणं हा एक चांगला क्षण आहे. आम्हाला माहित आहे की 140 कोटी लोकांच्या अपेक्षा आहेत. मी वानखेडेवर परत येण्यासाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन.
टीम इंडियाने 2024 च्या टी-20 वर्ल्डकपचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर सर्व खेळाडूंनी वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा केला. आता रोहित शर्माने चाहत्यांना वचन दिलंय की, तो एक चांगली कामगिरी करेल आणि ट्रॉफी पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियमवर आणणार आहे.
पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करत असून त्यामुळे टीम इंडिया आपले सर्व सामने हायब्रीड मॉडेलनुसार दुबईमध्ये खेळणार आहे. टीम इंडियाने शेवटचे 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावलं होतं. तर 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.