Virat Kohli, Ranji Trophy: विराट कोहली रणजी ट्रॉफी खेळणार! पण मानेचं दुखणं असताना खेळायला तयार कसा झाला?

Virat Kohli Will Play Ranji Trophy For Delhi: भारतीय संघतील स्टार फलंदाज विराट कोहली रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तो रेल्वेविरुद्ध खेळताना दिसून येणार आहे.
Virat Kohli, Ranji Trophy: विराट कोहली रणजी ट्रॉफी खेळणार! पण मानेचं दुखणं असताना खेळायला तयार कसा झाला?
virat kohlisaam tv
Published On

क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली तब्बल १२ वर्षानंतर पुन्हा एकदा रणजी ट्रॉफी खेळताना दिसून येणार आहे. याआधी विराट रणजी ट्रॉफीत परतणार अशी चर्चा सुरू होती. मात्र आता दिल्ली क्रिकेट असोसिएशनने कन्फर्म केलं आहे. दिल्लीचा पुढील सामना रेल्वेविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी विराट उपलब्ध असणार आहे.

Virat Kohli, Ranji Trophy: विराट कोहली रणजी ट्रॉफी खेळणार! पण मानेचं दुखणं असताना खेळायला तयार कसा झाला?
Ranji Trophy: विराट- रिषभ रणजी ट्रॉफी खेळणार; दिल्लीचा संघ जाहीर, केव्हा उतरणार मैदानात?

रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामन्यांना येत्या २३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. दिल्लीचा सामना राजकोटमध्ये सौराष्ट्रविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी विराट उपलब्ध नसेल. त्यानंतर रेल्वेविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी तो उपलब्ध असणार आहे. या सामन्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे.

या मालिकेत विराट भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसेल. त्यामुळे साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळून तो वनडे मालिकेसाठी रवाना होणार आहे. ही मालिका झाल्यानंतर तो चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला जाणार आहे.( Virat Kohli Will Play Ranji Trophy)

Virat Kohli, Ranji Trophy: विराट कोहली रणजी ट्रॉफी खेळणार! पण मानेचं दुखणं असताना खेळायला तयार कसा झाला?
Ranji Trophy: विराट- रोहित रणजी ट्रॉफी खेळणार? या दिवशी उतरणार मैदानात

प्रशिक्षक काय म्हणाले?

दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक सरनदीप सिंग यांनी केले की, ' विराट कोहलीने डीडीसीए अध्यक्ष आणि टीम मॅनेजमेंटला सांगून ठेवलंय की तो रेल्वेविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.' विराट कोहली मानेच्या दुखण्याने त्रस्त असल्याचे म्हटले जात होते. मात्र आता तो खेळण्यासाठी तयार आहे.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा फ्लॉप शो पाहायला मिळाला होता. या मालिकेत विराटची बॅट शांत राहिली होती. त्यामुळे बीसीसीआयने कडक नियमावली जाहीर केली आहे. एखादा खेळाडू जर दुखापतग्रस्त नसेल, तर त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळणं बंधनकारक असणार आहे.

विराटसह रोहित शर्माही रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. रोहित १० वर्षानंतर मुंबई संघासाठी रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. रोहितसह यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर देखील मुंबईकडून खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com