Ranji Trophy: विराट- रिषभ रणजी ट्रॉफी खेळणार; दिल्लीचा संघ जाहीर, केव्हा उतरणार मैदानात?

Delhi Squad For Ranji Trophy: रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामन्यांना येत्या २३ जानेवारीपासू सुरुवात होणार आहे.
Ranji Trophy: रणजी ट्रॉफीसाठी दिल्लीचा संघ जाहीर; विराट- रिषभला स्थान; केव्हा उतरणार मैदानात?
Virat kohliyandex
Published On

येत्या २३ जानेवारीपासून रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात होणार आहे. या सामन्यात स्टार खेळाडू खेळताना दिसून येणार आहेत. या स्पर्धेसाठी दिल्लीचा संघ जाहीर करण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या संघात विराट कोहलीलाही स्थान देण्यात आलं आहे. तर रिषभ पंतने कर्णधार पदासाठी नकार दिला आहे.

रणजी ट्रॉफीसाठी विराट कोहलीचा दिल्लीच्या रणजी संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र त्याच्या खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. रिषभ पंतला दिल्लीच्या कर्णधारपदाची ऑफर दिली होती. मात्र त्याने संघाचं नेतृत्व करण्यासाठी नकार दिला आहे. त्याने आयुष बदोनीला कर्णधार म्हणून कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आयुष बदोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात विराट कोहलीचा देखील समावेश करण्यात आला आहे.

Ranji Trophy: रणजी ट्रॉफीसाठी दिल्लीचा संघ जाहीर; विराट- रिषभला स्थान; केव्हा उतरणार मैदानात?
Ranji Trophy: विराट- रोहित रणजी ट्रॉफी खेळणार? या दिवशी उतरणार मैदानात

बीसीसीआयने गुरुवारी १० नवे नियम जाहीर केले आहेत. या १० नियमांपैकी सर्वात मोठा आणि महत्वाचा नियम म्हणजे, खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा नियम. या नियमानुसार, खेळाडूंना आता राष्ट्रीय संघात स्थान मिळवायचं असेल, तर देशांतर्गत क्रिकेट खेळणं गरजेचं असणार आहे. हा नियम युवा खेळाडूंसह वरिष्ठ खेळाडूंसाठीही सारखाच असणार आहे.

Ranji Trophy: रणजी ट्रॉफीसाठी दिल्लीचा संघ जाहीर; विराट- रिषभला स्थान; केव्हा उतरणार मैदानात?
Ranji Players Salary: एकाच हंगामात करोडपती? रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या खेळाडूला किती सॅलरी मिळते?

भारतीय संघाचा फ्लॉप शो

बीसीसीआयने लागू केलेले नवे नियम विराट कोहली आणि रिषभ पंतवरही लागू होतात. त्यामुळे दोघेही रणजी ट्रॉफी खेळताना दिसून येऊ शकतात. काही दिवसांपूर्वी दोघेही ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका खेळताना दिसून आले होते. मात्र दोघांनाही हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.

मालिकेतील पहिल्या सामन्यात विराटने शानदार शतकी खेळी केली. मात्र त्यानंतर पुढील चारही सामन्यांमध्ये विराटची बॅट शांत राहिली. रिषभ पंतकडूनही चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो देखील नावाला साजेशी कामगिरी करु शकला नव्हता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com