
भारतीय संघाला आधी न्यूझीलंड आणि मग ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवता आलेलं नाही. या लाजिरवाण्या कामगिरीनंतर आता बीसीसीआय ॲक्शन मोडवर आहे. भारतीय संघातील खेळाडूंच्या कामगिरीत भर घालण्यासाठी आता बीसीसीआयने काही नवीन नियम लागू केले आहेत. कोणते आहेत ते नियम? जाणून घ्या.
भारतीय क्रिकेट संघात अनुशासन आणण्यासाठी बीसीसीआयने कडक नियम लागू केले आहेत. आता खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणं अनिवार्य असणार आहे. दौऱ्यावर कुटुंबातील सदस्यांना घेऊन जाण्यावरही आता अटी शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. यासह ऍड शूटवर देखील बंदी घातली गेली आहे. जर खेळाडूंनी नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आता भारतीय खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणं गरजेचं असणार आहे.
भारतीय संघाला मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध खेळताना कसोटी मालिका गमवावी लागली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेतही भारताचा पराभव झाला. आता भारतीय संघ ४५ दिवसांपेक्षा अधिकच्या दौऱ्यावर असेल तर खेळाडूंना केवळ २ आठवडे आपल्या कुटुंबीयांसोबत राहण्याची अनुमती दिली जाईल. यासह वैयक्तिक आणि व्यावसायिक फोटो शूटवर बंदी घालण्यात आली आहे.
आता बीसीसीआयकडे खेळाडूवर कारवाई करण्याचे अधिकार असणार आहे. यानुसार खेळाडूवर आयपीएलसह देशांतर्गत क्रिकेटमधील सामने खेळण्यावर बंदी घातली जाऊ शकते. आता खेळाडूंना दौऱ्यावर असताना एकत्र प्रवास करावा लागणार आहे.
यासह सामना किंवा मालिका लवकर संपल्यास खेळाडूंना लवकर जाऊ दिलं जाणार नाही. खेळाडूंना जास्तीत जास्त १५० किलोग्रॅम वजनाचे लगेज घेऊन जाण्याची अनुमती दिली जाणार आहे. यासह शेफ, पर्सनल असिस्टंट किंवा सिक्योरिटीला सोबत घेऊन जाण्याची अनुमती दिली जाणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.