अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या मधल्या फळीचा फ्लॉप शो; एकाच षटकात ३ फलंदाज बाद

team india : अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या मधल्या फळीचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. एकाच षटकात ३ फलंदाज बाद झाले.
India vs New Zealand final match
India vs New Zealand finalSaam tv
Published On
Summary

टीम इंडियाच्या पहिल्या तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी

संजू सॅमसनचे शतक अवघ्या ११ धावांनी हुकलं.

मात्र मधल्या फळीतील फलंदाज ठरले अपयशी

आयसीसी मेन्स टी२० वर्ल्डकप २०२६ च्या फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड सामन्यात भारताच्या पहिल्या तीन फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली. सुरुवातीच्या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी खेळली. संजू सॅमसनचं अवघ्या ११ धावांमुळे शतक हुकलं. परंतु टीम इंडियाच्या मधळ्या फळीच्या फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला.

India vs New Zealand final match
मुंबईत पाणीबाणी! ऐन उन्हाळ्यात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार, नेमकं कोणत्या भागात?

टीम इंडिया आणि न्यूझीलंडदरम्यान टी२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेमध्ये अंतिम सामना नरेंद्र मोदी स्डेडियमध्ये सुरू आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेलने टॉस जिंकून गोलंदाज केली. टीम इंडियाला तिसऱ्यांदा इतिहास रचण्याची संधी आहे. या सामन्यासाठी प्रथम फलंदाजीचं आमंत्रण मिळाल्यावर सलामीवर जोडीने तुफानी खेळी खेळली.

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि ईशान किशनने अर्धशतकी खेळी खेळली. टीम इंडियाचे ८ षटकात १०० धावा झाल्या होत्या. अभिषेक शर्मानंतर ११ व्या षटकात संजू सॅमसनने अर्धशतक पूर्ण केलं. संजूने ३३ चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्याने टी२० वर्ल्डकप स्पर्धेत सलग तिसरं अर्धशतक ठोकलं आहे. ईशानने २३ चेंडूत अर्धशतक ठोकलं. ईशान ५४ धावा करून बाद झाला.

India vs New Zealand final match
टी20 वर्ल्डकपच्या फायनलआधी मोठी कारवाई; क्राइम ब्रँचकडून दोघांना अटक, कारण आलं समोर

किशन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार मैदानात उतरला. परंतु सूर्यकुमार यादव शून्य धावांवर बाद झाला. नीशमने एकाच चेंडूत तीन विकेट घेतले. संजू सॅमसन ईशान, किशान, सूर्यकुमार यादव असे तिन्ही खेळाडू एकाच षटकात बाद झाले. टीम इंडियाचे ३ गाडी बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या आणि तिलक वर्माने संघाची कमान सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण १९ व्या षटकात हार्दिक पंड्या बाद झाला. शेवटच्या षटकात शिवम दुबेने धुव्वादार फटकेबाजी केली. त्याने शेवटच्या षटकात २४ धावा केल्या. दुबेने ८ चेंडूत २६ धावा केल्या. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर २५६ धावांचं आव्हान ठेवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com