टी20 वर्ल्डकपच्या फायनलआधी मोठी कारवाई; क्राइम ब्रँचकडून दोघांना अटक, कारण आलं समोर

T20 World Cup final : टी20 वर्ल्डकपच्या फायनलआधी मोठी कारवाई करण्यात आली आहे. क्राइम ब्रँचकडून दोघांना अटक करण्यात आली आहे.
T20 World news
T20 World Cup final Saam tv
Published On
Summary

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 वर्ल्डकप २०२६चा फायनल होणार सामना

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना खेळवला जाणार

फायनलआधी क्राइम ब्रँचने दोन संशयितांना केली अटक

भारत आणि न्यूझीलंडच्या टी-२० वर्ल्डकप २०२६ फायनल आज रविवारी होणार आहे. या सामन्यावर जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. टी२० वर्ल्डकपचा अंतिम सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाने कंबर कसल्याचे दिसत आहे. अंतिम सामना अहमदच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी क्राइम ब्रँचने मोठी कारवाई केली आहे. क्राइम ब्रँचने दोघांना अटक केली आहे.

अहमदाबादच्या सिटी क्राइम ब्रँचकडून एक गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे उस्मानपुरा गुजरात विद्यापीठ एसटी बस स्टँडजवळ सापळा रचला. पोलिसांनी दोघांची झडती केली. या झडतीदरम्यान सामन्याचे २ तिकीट आढळून आले. आरोपींनी ऑनलाइन तिकिट खरेदी केली होती. त्यानंतर मूळ किंमतीच्या तीन पट किंमतीने विकत होते. आरोपी प्रति तिकीट १०,००० रुपये घेत होते. क्राइम ब्रँचकडून त्यांच्याकडून तिकीट जप्त केलेत. पोलिसांनी दोघांवर कारवाई सुरू केली आहे.

T20 World news
पुणे महापालिका अधिकाऱ्याच्या मुलाचा संतापजनक प्रताप; कॉलेजसमोर कारमध्ये बसून करायचा अश्लील कृत्य, पोलिसांनी मुसक्या आवळल्या

अहमदाबाद पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी काळाबाजार करणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला होता. तिकीटाचा काळाबाजार आढळल्यास कारवाई करणार असल्याचे म्हटलं होते. या प्रकरणातही पोलीस कारवाई करणार आहे. काळाबाजारी करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडणार नसल्याचाही इशारा दिला होता.

T20 World news
मुंबईत पाणीबाणी! ऐन उन्हाळ्यात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार, नेमकं कोणत्या भागात?

स्टेडियमवर १ लाख प्रेक्षक भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना पाहायला येण्याची शक्यता आहे. अशा सामन्यामुळे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना कमाईची संधी मिळत असते. तत्पूर्वी,टीम इंडियाला दुसरा टी२० वर्ल्डकप ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. याआधी टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात टी२० विश्वचषक २०२४ साली जिंकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com