RR vs KKR: हे घे 500 रूपये आणि मैदानात...; चाहत्याने रियान परागचे पाय धरल्यावर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Social Media Reaction on Riyan Parag: स्टेडियममधून एक उत्साही चाहता थेट मैदानावर धावत आला आणि रियान परागच्या पाया पडला! या अनोख्या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. याआधी रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांना भेटण्यासाठी चाहते सुरक्षा भेदून मैदानात घुसले होते.
Social Media Reaction on Riyan Parag
Social Media Reaction on Riyan Paragsaam tv
Published On

आयपीएलच्या १८ वा सिझनची सरुवात राजस्थान रॉयल्सच्या टीमसाठी काही फारशी चांगली झालेली नाही. रियान परागच्या नेतृ्त्वाखाली टीमने पहिले दोन सामने गमावले आहेत. बुधवारी केकेआरविरूद्ध झालेल्या सामन्यात राजस्थानच्या टीमला ८ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. मात्र सामना सुरु असताना एका घटनेने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. ही घटना म्हणजे एक फॅन बॉय चक्क रियान परागला भेटण्यासाठी मैदानात पोहोचला आणि त्याचे पाय धरले.

कधी घडली ही घटना?

केकेआरची टीम फलंदाजी करत असताना 12 व्या ओव्हरमध्ये ही घटना घटली. ११ वी ओव्हर संपताच रियान पराग गोलंदाजीसाठी आला. यावेळी त्याचा एक चाहता स्टेडियममधून धावत धावत आला आणि रियानच्या पाया पडला. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यापूर्वी रोहित शर्मा, विराट कोहली तसंच धोनी यांना भेटण्यासाठी चाहते थेट सुरक्षा तोडून मैदानात आले होते. मात्र परागसाठी असा चाहता आल्यानंतर सोशल मीडियावर मात्र खेळाडू ट्रोल होताना दिसतोय.

Social Media Reaction on Riyan Parag
ICC Ranking: IPL सुरु असताना भारतीय गोलंदाजांचं मोठं नुकसान! न्यूझीलंडच्या गोलंदाजाची मोठी झेप

रियान परागसंदर्भात काय मीम्स व्हायरल झालेत?

Social Media Reaction on Riyan Parag
Sanju Samson: वैभव अरोराच्या रॉकेट बॉलवर संजू सॅमसनची बत्ती गुल! स्टम्प उडून पडला लांब
Social Media Reaction on Riyan Parag
RR vs KKR: आधी हेल्मेट काढलं अन् मग धावत जाऊन डाईव्ह मारली; क्विंटन डी कॉकने घेतला भन्नाट झेल,VIDEO

या सामन्यातील संजू सॅमसनच्या जागी कर्णधार म्हणून रियान परागला साजेशी कामगिरी करता आली नाही. फलंदाजी करताना त्याने 15 बॉल्सचा सामना करत 25 रन्स केले. गोलंदाजीत त्याने 4 ओव्हरर्समध्ये एकही विकेट न घेता 25 रन्स दिले. तर दुसरीकडे केकेआरच्या या विजयाचा हिरो ठरला विकेटकीपर फलंदाज क्विंटन डी कॉक, ज्याने ६१ चेंडूत नाबाद ९७ रन्स केले. त्याच्या खेळीत 8 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.

Social Media Reaction on Riyan Parag
IPL 2025 RR vs KKR: क्विंटन डी कॉकच्या झंझावात खेळीने राजस्थानचा धुव्वा; KKR ने उघडलं विजयाचं खातं

सामन्यानंतर काय म्हणाला रियान पराग?

"170 ही खरोखर चांगला स्कोर होऊ शकला असता. मुळात ते आमचं लक्ष्य होते. इथल्या विकेट्स जाणून घेण्यासाठी मी वैयक्तिकरित्या थोडी घाई केली. आम्हाला 20 रन्स कमी होत्या. क्विन्सीला (क्विंटन डी कॉक) लवकर आऊट करायचं होतं मात्र तसं झालं नाही. तो खरोखरच चांगला खेळला, असं परागने सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com