RR vs KKR: आधी हेल्मेट काढलं अन् मग धावत जाऊन डाईव्ह मारली; क्विंटन डी कॉकने घेतला भन्नाट झेल,VIDEO

Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders, Quinton De Kock: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात क्विंटन डी कॉकने शानदार झेल घेतला आहे.
RR vs KKR: आधी हेल्मेट काढलं अन् मग धावत जाऊन डाईव्ह मारली; क्विंटन डी कॉकने घेतला भन्नाट झेल,VIDEO
quinton de kocktwitter
Published On

आयपीएल २०२५ स्पर्धेतील सहावा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. संघातील मुख्य फलंदाज स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर रियान परागवर संघाचा डाव सांभाळण्याची जबाबदारी होती. मात्र तो देखील स्वस्तात माघारी परतला. त्याला बाद करण्यासाठी क्विंटन डी कॉकने शानदार झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

RR vs KKR: आधी हेल्मेट काढलं अन् मग धावत जाऊन डाईव्ह मारली; क्विंटन डी कॉकने घेतला भन्नाट झेल,VIDEO
IPL 2025 Live : श्रेयस 97 वर असताना शशांकने स्ट्राईक का दिली नाही? इनिंग संपल्यावर स्पष्टचं सांगितलं, शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडलं?

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाकडून संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानावर आली होती. मात्र या जोडीला हवी तशी सुरुवात करुन देता आली नाही. संजू सॅमसन अवघ्या १३ धावा करत माघारी परतला.

त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रियान पराग फलंदाजीला आला होता. संजू बाद झाल्यानंतर रियानकडून मोठ्या खेळीची गरज होती. त्याला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र रियानला मिळालेल्या सुरुवातीचा फायदा करुन घेता आला नाही. तो २५ धावा करत माघारी परतला.

तर झाले असे की, कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून आठवे षटक टाकण्यासाठी वरुण चक्रवर्ती गोलंदाजीला आला होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर रियान परागने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन उंच हवेत गेला. त्यावेळी क्लोज किपिंग करत असलेल्या डी कॉकने आधी हेल्मेट काढलं आणि धावत जाऊन डाईव्ह मारत झेल घेतला. या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com