RR VS KKR: राजस्थान विरुद्ध कोलकाता सामना रद्द होणार? समोर आली मोठी अपडेट

Barsapara Guwahati Stadium Weather and Pitch Report: आज गतविजेता कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात गुवाहाटीमध्ये सामना खेळला जाईल. ७.३० वाजता सामन्याला सुरुवात होईल.
RR vs KKR
RR vs KKRgoogle
Published On

आज आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल हे संघ गुवाहाटीमध्ये भिडतील. भारतीय वेळेनुसार हा सामना ७.३० वाजता सुरु होईल. हा सामना गुवाहाटीमधील बरसपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. पण या सामनादरम्यान पाऊस खलनायकाची भूमिका बजावू शकतो. याआधी, आयपीएलच्या २०२५चा पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु यांच्यात इडन गार्डन्सवर खेळला गेला होता. या सामन्यादरम्यान पाऊस सतत पडत होता तरीही, याचा परिणाम सामन्यावर झाला नाही. परंतु आज गुवाहाटीमध्ये होणाऱ्या सामन्यात पावसाचा सामन्यावर परिणाम होईल का? तसेच गुवाहाटीचे वातावरण कसे असेल, जाणून घ्या.

आयपीएल २०२५ च्या पहिल्याच सामन्यात आरसीबीने कोलकाताचा ७ विकेट्सने पराभव केला. तर सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा ४४ धावांनी पराभव केला. दोन्ही संघांनी हंगामाची सुरुवात पराभवाने केली. आता दोन्हीही संघ आपला पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. केकेआर विरुद्ध राजस्थान सामन्यासाठी गुवाहाटीची पिच कशी असेल ते जाणून घेऊयात.

रॉजस्थान रॉयल विरुद्ध कोलकात नाइट रायडर्स RR vs KKR Pitch Report

गुवाहाटीमधील बरसपारा क्रिकेट स्टेडियमची पिच फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. आकडेवारीवरुन असे दिसून येते की, गुवाहाटीच्या पिचवर फलंदाजी करणे सोपे होऊ शकते. तसेच गोलंदाजाना कमी मदत मिळेल. या पिचवर सलग मोठी धावसंख्या उभारण्यात आली आहे. या मैदानावर नाणेफेक जिंकणारे संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतात. या मैदानावर रात्रीच्या वेळी दव मोठी भूमिका बजावेल. त्यामुळे गोलंदाजी करणे कठीण होईल. या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना सर्वाधिक १९९/४ तर सर्वाधिक कमी १४२/९ धावसंख्या उभारण्यात आली.

RR vs KKR
Irfan Pathan: खेळाडूंशी पंगा घेणं इरफान पठानला महागात पडलं; आयपीएल कॉमेंट्री पॅनलमधून थेट बाहेर काढलं

गुवाहाटीत हवामान कसे असेल?

२६ मार्च रोजी गुवाहाटीमध्ये पावसाची शक्यता २ टक्के राहील. तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते, तर रात्रीचे तापमान १९ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी १० किलोमीटर असेल.

RR vs KKR Head to Head कसा राहिला दोन्ही संघाचा रेकॉर्ड

कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल हे दोन्ही संघ आयपीएलमध्ये २९ वेळेस आमनेसामने आले आहेत. यापैकी दोन्ही संघानी प्रत्येकी १४ सामने जिंकले तर, एक सामना अनिर्णित राहिला आहे.

आरआर विरुद्ध केकेआर संभाव्य प्लेइंग-११

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), रियान पराग, नितीश राणा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, महेश थीकशन, तुषार देशपांडे, संदीप शर्मा ,फजलहक फारुकी, वानिन्दू हसरंगा

कोलकाता नाईट रायडर्स: क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), वेंकटेश अय्यर, अंगकृष रघुवंशी, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमनदीप सिंग, हर्षित राणा, स्पेन्सर जॉन्सन, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, अनुकुल रॉय

RR vs KKR
Chennai Super Kings: ऋतुराज नावाला कॅप्टन, पडद्यामागे धोनीच चेन्नईचा कर्णधार? स्वतःच थालाने केला खुलासा, म्हणाला...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com