
चेन्नई सुपर किंग्स हा संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. एमएस धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेला पाच वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. परंतु गेल्या वर्षी म्हणजेच आयपीएल २०२४ च्या आधी त्याने चेन्नईची कमान ऋतुराज गायकवाडकडे सोपवली. चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले असूनही पडद्यामगील सर्व निर्णय धोनी घेतो, अशा सर्व प्रकारच्या चर्चांना महेंद्र सिंह धोनीने फेटाळून लावले आहे.
रविवारी चेन्नईने मुंबई इंडियन्सवर चार विकेट्सने विजय मिळवल्यानंतर धोनीने गायकवाडचे नेतृत्व, स्वतःचा फॉर्म यावर भाष्य केले आहे. ऋतुराजने त्याच्या वैयक्तिक कामगिरीसह, कर्णधारपदानेही अनेकांना प्रभावित केले आहे. पण अनेकांचा असा विश्वास आहे की धोनी अजूनही पडद्यामागे स्वतः संघ चालवत आहे. या मुद्द्यावर आता धोनीने स्वतः मौन सोडले आहे.
कर्णधारपदी ऋतुराज गायकवाड
जिओहॉटस्टारला दिलेल्या इंटरव्हयूमध्ये धोनी म्हणाला की, 'ऋतुराज बऱ्याच काळापासून आमच्या टीमचा भाग आहे. त्याचा स्वभाव खूप चांगला आहे, तो खूप शांत आहे, संयमी आहे. म्हणूनच आम्ही त्याला कर्णधार म्हणून निवडले.मला आठवतंय की स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मी त्याला सांगितलं होतं की, जर मी तुम्हाला सल्ला दिला तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तो पाळावा लागेल. मी शक्य तितके दूर राहण्याचा प्रयत्न करेन. अनेकांना वाटले की मी पडद्यामागे निर्णय घेत आहे. पण सत्य हे आहे की तो ९९ टक्के निर्णय घेत होता'. तसेच मी गायकवाडशी चर्चा करतो परंतु माझा सल्ला त्याच्यावर लादत नाही. असंही धोनीने स्पष्टपणे सांगितले.
भारतातील विकेट्सची परिस्थिती
धोनी म्हणाला, '२००८ मध्ये आम्ही ज्या पद्धतीने टी-२० खेळलो आणि गेल्या वर्षी आयपीएलमध्ये आम्ही ज्या पद्धतीने खेळलो त्यामध्ये खूप फरक होता. पूर्वी विकेट खूप टर्न घ्यायचे, पण आता भारतातील विकेट पूर्वीपेक्षा खूपच चांगल्या झाल्या आहेत. जे फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर आहे. फलंदाज आता जोखीम घेण्यास तयार आहेत. आता फलंदाजांना असे वाटते की, ते योग्य क्रिकेट शॉट्स ते मोठे स्ट्रोक खेळू शकतात. तसेच ते त्यांच्या शॉट सिलेक्शनमध्ये सुधारणा करत आहेत. मग ते वेगवान गोलंदाजाविरुद्ध रिव्हर्स स्कूप असो, स्वीप असो किंवा रिव्हर्स स्वीप असो.
मी वेगळा नाही, मला जुळवून घ्यावे लागेल
जिओहॉटस्टारला दिलेल्या इंटरव्हयूमध्ये धोनी सांगितले की, 'मी त्यांच्यापेक्षा वेगळा नाही.मलाही स्वतःला जुळवून घ्यावे लागेल. मी जिथे फलंदाजी करत आहे, हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. तुम्हाला प्रासंगिक राहण्याचा प्रयत्न करावा लागेल. चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा चार विकेट्सने सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने १५५ धावा केल्या होत्या. चेन्नईने सहा विकेट गमावून मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.