Suryakumar Yadav: टीम इंडियातून काढल्यानंतर सूर्या कोपला! 200 च्या स्ट्राइक रेटनं गोलंदाजांची काढली पिसे

suryakumar yadav smashes 72 Runs : सूर्यकुमार यादव याला टीम इंडियातून वगळलं आहे. सध्या तो मुंबई टी २० लीगमध्ये खेळतोय. बरेच दिवस झाले त्याची बॅट तळपली नव्हती. पण या स्पर्धेत त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडलाय. २०० च्या स्ट्राइक रेटनं त्यानं स्फोटक फलंदाजी केलीय.
सूर्यकुमार यादवची बॅट तळपली
Suryakumar Yadav saam tv
Published On

भारताचा मिस्टर ३६० आणि विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याला खराब फॉर्ममुळं कर्णधारपदच नव्हे तर, संघातलं स्थानही गमवावं लागलं. निवड समितीनं त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र, बऱ्याच महिन्यांपासून फलंदाजीची लय हरवलेल्या सूर्यकुमारचं वादळ टी २० मुंबई लीगमध्ये बघायला मिळालं. टी २० मुंबई लीगमध्ये खेळणाऱ्या सूर्यानं वादळी खेळी केली. त्यानं २०० च्या स्ट्राइक रेटनं फलंदाजी केली आणि नाबाद राहिला.

सध्या टी २० मुंबई लीग सुरू आहे. सूर्यकुमार यादवही या स्पर्धेत खेळत आहे. सोमवारी एमएससी मराठा रॉयल्स विरुद्ध ट्रायम्फ नाइट्स MNE यांच्यात सामना झाला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या एमएससी मराठा रॉयल्सचा संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही. त्यांनी सर्वबाद १५२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ट्रायम्फ नाईट्स एमएनई संघानं अवघ्या १६ षटकांत ४ गडी गमावून टार्गेट पूर्ण केलं आणि या सामन्यात विजय मिळवला.

सूर्यकुमारच्या ३६ चेंडूंत ७२ धावा

या सामन्यात सूर्यकुमार यादवने वादळी खेळी केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या सूर्याने अवघ्या ३६ चेंडूंत ७२ धावा कुटल्या. २०० च्या स्ट्राइक रेटने त्यानं धावा केल्या. यात १३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. सूर्यानं संघाला विजय मिळवून देत ही नाबाद खेळी साकारली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या नुतन कुमार गोयल यानं ४२ चेंडूंत ५६ धावा केल्या. त्यात चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.

सूर्यकुमार यादवची बॅट तळपली
Suryakumar Yadav : वर्ल्डकपविजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला हटवलं; टी २० संघातही स्थान नाही- रिपोर्ट्स

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने यावर्षी मार्चमध्ये टी २० वर्ल्डकप जिंकला होता. संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेत सूर्यकुमार यादवची जादुई खेळी बघायला मिळाली नाही. अनेक सामन्यांत तो एकेका धावेसाठी चाचपडताना दिसला. त्यानंतर आयपीएल सामन्यांतही सुरुवातीला तो अडखळताना दिसला. त्यामुळं सूर्यकुमार यादवला टीम इंडियाचं कर्णधारपद गमवावं लागलं. सूर्यकुमारच्या जागी श्रेयस अय्यर भारतीय संघाचा नवा कर्णधार झाला आहे. नुकतीच बीसीसीआयच्या निवड समितीनं आयर्लंड आणि इंग्लंड यांच्याविरुद्ध होणाऱ्या टी २० मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. कर्णधारपद गेलंच, पण संघातही त्याला स्थान दिलेलं नाही.

सूर्यकुमार यादवची बॅट तळपली
Suryakumar Yadav: सूर्यकुमारला डबल धक्का; BCCI नंतर मुंबई इंडिन्यसही साथ सोडणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com