

भारतीय संघाने वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत आतापर्यंत दमदार खेळी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने सुरूवातीच्या पाचही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. आता सहाव्या सामन्यात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध दोन हात करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.
भारतीय संघाचा इंग्लंडविरूद्ध होणारा सामना लखनऊच्या इकाना स्टेडियमवर होणार आहे. हा सामना येत्या २९ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी प्लेइंग ११ निवडणं हे रोहित शर्मा आणि राहुल द्रविडसाठी मोठं आव्हाण असणार आहे. या सामन्यातही हार्दिक पंड्या खेळताना दिसून येणार नाहीये. त्यामुळे या सामन्यातही प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतो.
सूर्यकुमार यादवला मिळू शकते संधी..
या स्पर्धेत रोहित शर्मा आणि शुभमन गिल भारतीय संघासाठी डावाची सुरूवात करताना दिसून येत आहेत. सुरूवातीच्या २ सामन्यांमध्ये शुभमन गिलला दुखापतीमुळे संघाबाहेर राहावं लागलं होतं. त्याच्या अनुपस्थितीत ईशान किशनला संधी देण्यात आली होती.
तर न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमारला संधी दिली गेली होती. तो या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा मोठा प्रयोग करू शकतो. सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतो.
असं झाल्यास श्रेयस अय्यर पाचव्या आणि केएल राहुल सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. पण या महत्वाच्या सामन्यात रोहित शर्मा हा प्रयोग करण्याची शक्यता खुप कमी आहे. कारण श्रेयस अय्यर गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. (Latest sports updates)
तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने गेल्या सामन्यात ५ गडी बाद करत न्यझीलंडला गुडघे टेकण्यास भाग पाडलं होतं. त्यामुळे इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या सामन्यातही त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.
या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.