Viral Video: राशिदच्या त्या रन आउटने करून दिली सेहवागच्या रन आउटची आठवण! Video तुफान व्हायरल

Adil Rashid- Virender Sehwag Runout Video: या सामन्यानंतर विरेंद्र सेहवागचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.
Adil Rashid- Virender Sehwag Runout Video
Adil Rashid- Virender Sehwag Runout Videotwitter
Published On: 

Adil Rashid- Virender Sehwag Runout Video:

इंग्लडचा फिरकीपटू आदिल राशिदच्या रन आउटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात यष्टिरक्षक कुसल मेंडिसने नॉन स्ट्राईकच्या दिशेने डायरेक्ट थ्रो करत त्याची विकेट मिळवली. आदिल राशिदच्या रन आऊटने नेटकऱ्यांना वीरेंद्र सेहवागच्या रन आउटची आठवण करून दिली आहे.

फलंदाजीतील हलगर्जीपणा आदिल राशिदला नडला..

एकापाठोपाठ विकेट्सची रांग लागल्यानंतर इंग्लंडकडून आदिल राशिद दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. तो ७ चेंडू खेळून २ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी डावातील ३२ वे षटक सुरु होते. श्रीलंकेकडून ३२ वे षटक टाकण्यासाठी महिश थिक्षाणा गोलंदाजीला आला होता.

या षटकातील शेवटचा चेंडू त्याने लेग साईडच्या दिशेने वाईड टाकला. हा चेंडू यष्टीरक्षण करत असलेल्या कुसल मेंडिसने पकडला आणि क्षण ही न दवडता नॉन स्ट्राईकच्या दिशेने फेकला. त्यावेळी आदिल राशिद क्रिझच्या बाहेर होता. डायरेक्ट हिट लागला त्यावेळी त्याची बॅट क्रिझमध्ये नव्हती त्यामुळे अंपारयने त्याला बाद घोषित केलं.

Adil Rashid- Virender Sehwag Runout Video
Jos Buttler Statement: इंग्लंडच्या पराभवानंतर कर्णधार जोस बटलर अक्षरश: रडला; म्हणाला,'प्रामाणिकपणे सांगतो..'

विरेंद्र सेहवागच्या रन आउटची करून दिली आठवण..

आदिल राशिदच्या रन आउटने सर्वांनाच विरेंद्र सेहवागच्या रन आउटची आठवण करुन दिली आहे. २००७ मध्ये झालेल्या वनडे सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाची धावसंख्या ११८ वर ३ असताना विरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंग फलंदाजी करत होते.

त्यावेळी लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीवर विरेंद्र सेहवागने थर्ड मॅनच्या दिशेने शॉट मारला. त्यावेळी विरेंद्र सेहवाग आरामात धावला. त्याला असं वाटलं होतं की, एक धाव सहज पूर्ण करता येईल.

थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाने क्षणही न दवडता चेंडू उचलला आणि यष्टीरक्षकाकडे फेकला. यष्टीरक्षण करत असलेल्या कुमार संगकाराने पाहिलं की, सेहवाग अजुनही क्रिझमध्ये पोहोचलेला नाही. त्याने नॉन स्ट्राईकच्या दिशेने डायरेक्ट थ्रो करत सेहवागला बाद केलं होतं.

Adil Rashid- Virender Sehwag Runout Video
Kusal Mendis Statement: सेमीफायनलमध्ये आमची जागा फिक्स... इंग्लंडला धुळ चारताच श्रीलंकेचा कॉन्फिडन्स वाढला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com