Breaking News

Angelo Mathews Wicket Controversy: 'अंपायरने योग्य निर्णय ...', मॅथ्यूजच्या विकेटवर श्रीलंकेच्या कर्णधाराचे लक्षवेक्षी विधान

Kusal Mendis On Angelo Mathews Wicket: वाचा अँजेलो मॅथ्यूजच्या विकेटवर काय म्हणाला श्रीलंकेचा कर्णधार
Angelo Mathews Wicket Controversy
Angelo Mathews Wicket Controversytwitter
Published On: 

Kusal Mendis On Angelo Mathews Wicket:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ३८ व्या सामन्यात श्रीलंका आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात बांगलादेशने ३ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यातील विजयापेक्षा श्रींलकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूज जास्त चर्चेत राहिला.

मैदानावर फलंदाजी करायला आल्यानंतर त्याने पहिला चेंडू खेळण्यासाठी निर्धारीत वेळेपेक्षा जास्त वेळ घेतला. त्यामुळे त्याला टाईम आऊट घोषित करण्यात आलं.

तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट होणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. दरम्यान या प्रकरणावर श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने मोठं वक्तव्य केलं आहे.

कुसल मेंडिसने सामन्यानंतर बोलताना म्हटले की,'हे खूप निराशाजनक आहे. कारण मॅथ्यूज जेव्हा क्रिझवर पोहोचला त्यावेळी ५ सेकंद शिल्लक होती. फलंदाजीला आल्यानंतर त्याला जाणवलं की त्याच्या हेल्मेटचा स्ट्रॅप तुटला आहे. के खूप निराशाजनक आहे की, अंपायरने योग्य निर्णय घ्यायला हवा होता. आम्हाला त्यावेळी मॅथ्यूजची गरज होती.'

अँजेलो मॅथ्यूज जेव्हा फलंदाजीला आला त्यावेळी २५ वे षटक सुरु होते. सदीरा समरविक्रमा नुकताच बाद होऊन माघारी परतला होता. संघाची धावसंख्या ४ गडी बाद १३५ धावा इतकी होती. अँजेलो मॅथ्यूजसारख्या अनुभवी फलंदाजाने येऊन धावा करणं संघासाठी अतिशय महत्वाचं होतं. मात्र मॅथ्यूजला एकही चेंडू न खेळता माघारी परतावं लागलं. (Latest sports updates)

Angelo Mathews Wicket Controversy
Angelo Mathews Statement: शाकिबचं कृत्य लज्जास्पद ! सामन्यानंतर अँजेलो मॅथ्यूज संपूर्ण संघावर गरजला,म्हणाला...

हा श्रीलंकेला मोठा धक्का होता.मॅथ्यूज बाद होऊन माघारी परतल्यानंतर चरीथ असलंकाने शतकी खेळी केली आणि धनजंय डि सिल्वाने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाची धावसंख्या २७९ धावांपर्यंत पोहचवली.

Angelo Mathews Wicket Controversy
Viral Video: मुशफिकुर रहीमची रॉकेट कॅच! वाघासारखी झडप घेत पकडला अविश्वसनीय झेल, VIDEO पाहून चकित व्हाल

बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी २८० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशकडून नजमूल हुसेन शांतोने सर्वाधिक ९० धावांची खेळी केली. तर कर्णधार शाकिब अल हसनने ८२ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेवर ३ गडी राखून मात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com