Viral Video: मुशफिकुर रहीमची रॉकेट कॅच! वाघासारखी झडप घेत पकडला अविश्वसनीय झेल, VIDEO पाहून चकित व्हाल

Mushfiqur Rahim Catch Video: मुशफिकुर रहीमने डाईव्ह मारत भन्नाट झेल टिपला आहे.
Mushfiqur Rahim Catch Video
Mushfiqur Rahim Catch Videotwitter
Published On

Mushfiqur Rahim Catch Video:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ३८ वा सामना श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. डावाची सुरुवात करताना बांगलादेशने अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या ५ धावांवर श्रीलंकेला मोठा धक्का दिला.

कुसल परेरा अवघ्या ४ धावांवर माघारी परतला. त्याला बाद करण्यासाठी बांगलादेशचा यष्टीरक्षक मुशफिकुर रहीमने एक भन्नाट झेल टिपला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे. या आमंत्रणाचा स्वीकार करत पथुम निसंका आणि कुसल परेरा ही जोडी मैदानावर आली. तर बांगलादेशकडून शोरीफुल इस्लाम गोलंदाजीला आला होता.

डाव्या हाताच्या शोरीफुल इस्लामने ओव्हर द विकेटचा मारा करत ऑफ साईडच्या बाहेर चेंडू टाकला. या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या कुसल परेराने ऑफ साईडच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला.

मात्र चेंडू बॅटचा कडा घेत यष्टीरक्षक मुशफिकुर रहीमच्या हातात गेला. विशेष बाब म्हणजे हा चेंडू बॅटची कडा घेत पहिल्या स्लिपकडे जात होता.मात्र मुशफिकुर रहीमने डाव्या बाजूला डाइव्ह मारत भन्नाट एकहाती झेल टिपला. (Latest sports updates)

हा झेल टिपल्यानंतर फलंदाजालाही विश्वास बसत नव्हता. हा व्हिडिओ आयसीसीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. काही युझर्सचं असं म्हणणं आहे की, हा झेल वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सर्वोत्तम झेल आहे.

सध्या श्रीलंकेचा संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. श्रीलंकेने आतापर्यंत खेळलेल्या ७ पैकी २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

तर बांगलादेशबद्दल बोलायचं झालं तर, बांगलादेशला ७ पैकी केवळ १ सामन्यात विजय मिळवता आला आहे. २ गुणांसह बांगलदेशचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. हे दोन्ही संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com