विकास मिरगणे, नवी मुंबई
Navi Mumbai Water Crisis News Update : नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा कारण शुक्रवारी तब्बल 18 तास पाणीपुरवठा बंद राहणारे आहे. नेरुळ सेक्टर-46 मधील मुख्य जलवाहिनी दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी सकाळी 10 ते शनिवारी संध्याकाळ पर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या भागात पाणीपुरवठा होणार नाही. शुक्रवारी संध्याकाळचा आणि शनिवारी सकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.
नेरुळमधील मुख्य जलवाहिनी दुरुस्तीमुळे नवी मुंबईत १८ जुलैपासून १८ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नेरुळ सेक्टर-४६ मधील अक्षर बिल्डिंगजवळील १७०० मि.मी. व्यासाच्या मोरबे मुख्य जलवाहिनीमध्ये वारंवार गळती होत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकली आहे. नवीन जलवाहिनीस जुनी जलवाहिनी दोन्ही बाजूंनी जोडण्याचे काम शुक्रवार, १८ जुलै रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार असून, ते शनिवार, १९ जुलै रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे १८ तास मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
यामुळे बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, तसेच मुख्य जलवाहिनीवरील थेट नळजोडणी असलेले क्षेत्र आणि सिडकोच्या खारघर व कामोठे नोडमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः खंडित होणार आहे. महापालिकेन दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी संध्याकाळचा आणि १९ जुलै रोजी सकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच १९ जुलैच्या संध्याकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे लोकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नवी मुंबई महापालिकेने केल आहे.
खारघर ,उलवे परिसरातील नागरिकांना चार दिवसांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी टँकरने पुरवले जात आहे. पाणी दूषित असल्याने अनेक नागरिकांना अतिसार, उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला आहे. काही सोसायट्यांमध्ये पाण्याच्या मोटरी लावून पाणी चोरण्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे इतर सोसायट्यांना येणाऱ्या पाण्याचा दाब कमी झाला आहे.
सिडको पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. तसेच सिडकोणी बांधलेल्या इमारतींना सुद्धा चार दिवसापासून कमी प्रमाणात पाणी येत आहे त्यामुळे खारघर मधील अनेक नागरिकांना पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे एकीकडे धो धो पाऊस पडतोय मात्र सोसायटीने पाणी मिळत नाही अशी अवस्था सध्या निर्माण झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.