Accident : मध्यरात्री सोलापूरमध्ये भीषण अपघात, डॉक्टरांचा जागीच मृत्यू, मृतदेह ६ तास कारमध्येच पडून

Solapur Accident : सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात डॉ. आशिष पनशेट्टी यांचा मध्यरात्री कार अपघातात मृत्यू झाला. गाडी उलटल्यामुळे ते आत अडकले आणि मदत मिळण्याअगोदरच मृत्यू झाला. मृतदेह सहा तासांनंतर गाडीत आढळला.
Solapur doctor Dr. Ashish Panshetty dies in midnight car crash
Solapur doctor Dr. Ashish Panshetty dies in midnight car crash
Published On

Solapur Doctor Accident Death : सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यातील एका डॉक्टराचा अपघाती मृत्यू झालाय. सोलापूरहून तडवळे येथे जाताना मध्यरात्री कारचा भयंकर अपघात जाला. त्यामध्ये ४० वर्षीय डॉ. आशिष पनशेट्टी यांचा जागीच मृत्यू झालाय. मध्यरात्री अपघात झाल्याने रस्तावर गर्दी कुणीही नव्हते, त्यामुळे वेळीच वैद्यकीय मदत मिळाली नाही. डॉक्टरांचा मृतदेह सहा तास गाडीत पडून होता.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील तडवळ गावात एक दुखद घटना घडली आहे. येथील प्रसिद्ध डॉक्टर आशिष इरण्णा पनशेट्टी (वय ४०) यांचा रविवारी रात्री कार अपघातात मृत्यू झाला. या घटनेने तडवळ गावात शोककळा पसरली आहे. डॉ. आशिष पनशेट्टी हे सोलापूरहून तडवळकडे कारने परतत होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. सकाळी त्यांचा मृतदेह त्यांच्या गाडीत आढळून आला.

Solapur doctor Dr. Ashish Panshetty dies in midnight car crash
दुचाकी स्लीप झाली अन् धावत्या ट्रेलरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्रे गावाजवळ त्यांची गाडी रस्त्यावरील खड्ड्यात अडकली आणि नंतर जवळच्या लाकडाच्या ढिगाऱ्यावर आदळून पलटी झाली. या अपघातात डॉ. आशिष गाडीच्या स्टेअरिंग आणि सीटमध्ये अडकल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यात रात्रीची वेळ असल्यामुळे मदतही मिळाली नाही, त्यांचा कारमध्येच मृत्यू झाला. डॉ. आशिष हे तडवळ येथे हॉस्पिटल चालवत होते आणि त्यांच्या कार्यामुळे गावकऱ्यांमध्ये त्यांचा मोठा आदर होता. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Solapur doctor Dr. Ashish Panshetty dies in midnight car crash
देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार, तारीख अन् ठिकाण झालं फिक्स, वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com