

भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर आणि अनुभवी विकेटकीपर-फलंदाज आदित्य तारे यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर सोबो मुंबई फाल्कन्सने नुवामा प्रायव्हेट टी२० मुंबई लीग २०२६ मध्ये आपला पहिला विजय नोंदवलाय. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या रोमांचक सामन्यात फाल्कन्सने मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्सवर ३ विकेट्स राखून विजय मिळवला.
इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरलेल्या श्रेयस अय्यरने २४ चेंडूंमध्ये २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३० रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने ओपन फलंदाजांनी ठेवलेलं रन रेट कायम ठेवत टीमला मजबूत स्थितीत नेलं. त्याच्या आधी आदित्य तारेने अवघ्या १९ चेंडूंमध्ये ४२ रन्सची आक्रमक खेळी करत डावाला वेग दिला. ओपनर इशान मुलचंदानीने २४ चेंडूंमध्ये २९ रन्स करत ५७ रन्सची भक्कम ओपनिंग पार्टनरशिप रचली. या तिघांच्या योगदानामुळे फाल्कन्सने १२ ओव्हर्समध्ये १०६ रन्सचा टप्पा पार केला.
अय्यर बाद झाल्यानंतर फाल्कन्सच्या फलंदाजीत अचानक घसरण झाली आणि टीमने २१ रन्समध्ये ४ विकेट्स गमावले. यानंतर रॉयल्सच्या बाजूने झुकताना दिसला. अशा दबावाच्या परिस्थितीत गौतम वाघेलाने संयम राखत २३ चेंडूंमध्ये नाबाद २६ रन्स करत डाव सावरला आणि फाल्कन्सला ५ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवून दिला.
मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्सकडून साहिल जाधवने उत्कृष्ट अर्धशतक झळकावलं. त्याने ३० चेंडूंमध्ये ५२ रॅन्स करत टीमचा डाव सावरला. चिन्मय सुतारने २३ रन्सचं योगदान दिलं. मात्र नियमित अंतराने पडलेल्या विकेट्समुळे टीम मोठा स्कोर उभारू शकली नाही.
फाल्कन्सच्या गोलंदाजीत यश दिचोळकरने निर्णायक भूमिका बजावली. त्याने महत्त्वाच्या क्षणी विकेट्स घेत रॉयल्सच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्सवर अखेर श्रेयस अय्यरच्या टीमने विजय मिळवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.