Jaspal Rana: मनु भाकरचे प्रशिक्षक नेमबाज जसपाल राणा यांचं निधन; वयाच्या 49 वर्षी घेतला अखेरचा श्वास

Indian Shooter: भारतीय नेमबाजी क्षेत्रातील दिग्गज आणि पद्मश्री विजेते जसपाल राणा यांचे ४९ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी भारतासाठी अनेक पदके जिंकली आणि मनू भाकरसारख्या ऑलिम्पिक पदक विजेत्यांना प्रशिक्षण दिले.
Jaspal Rana
Jaspal Ranasaam tv
Published On

भारताचे महान नेमबाज, जसपाल राणा यांचं आज निधन झालं आहे. शुक्रवारी दिल्लीतील एका रुग्णालयात त्यांचं निधन झालं. ते ४९ वर्षांचे होते. नेमबाजीतून निवृत्त झाल्यानंतर हे माजी आंतरराष्ट्रीय नेमबाज आता प्रशिक्षक म्हणून काम करत होते.

जसपाल राणा यांच्या निधनाच्या बातमीने क्रीडा जगतात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जसपाल राणा नुकतंच म्युनिकहून मायदेशी परतत होते. ते आयएसएसएफ वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय टीमचे उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक होते. भारतीय संघाच्या प्रभावी कामगिरीनंतर ते म्युनिकहून नवी दिल्लीला परतत होते.

Jaspal Rana
Ben Stokes Fight Video: इंग्लंड कर्णधार बेन स्टोक्स अडचणीत, नाईटक्लबबाहेर लाथा-बुक्क्यांनी मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल

प्रवासादरम्यान बिघडली तब्येत

म्युनिकहून नवी दिल्लीला प्रवास करत असताना जसपाल राणा यांची प्रकृती बिघडली. दिल्लीत आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने थेट विमानतळावरून साकेतमधील मॅक्स रुग्णालयात नेण्यात आले. मॅक्स रुग्णालयातील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते. शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टद्वारे महान नेमबाज जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. त्यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलंय की, जसपाल राणा हे एक उत्कृष्ट खेळाडू आणि प्रशिक्षक असण्यासोबतच एक अत्यंत दयाळू व्यक्ती होते. भारतात नेमबाजी या खेळाला लोकप्रिय करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Jaspal Rana
T20 Mumbai League: श्रेयस अय्यर-आदित्य तारेची तुफानी सुरुवात, फाल्कन्सने रॉयल्सवर थरारक विजय मिळवत उघडलं खातं

जसपाल राणा यांनी जागतिक नेमबाजी चॅम्पियनशिप आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदकं जिंकली आहेत. देशात नेमबाजी लोकप्रिय करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली असं मानले जाते. मूळचे उत्तराखंडमधील उत्तरकाशीचे रहिवासी असलेल्या जसपाल राणा यांना नेमबाजी क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल २००२ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

Jaspal Rana
T20 League Mumbai: फायनलमध्ये मराठाची 'रॉयल' एन्ट्री; नॉर्थ मुंबई पँथर्सचा विजयरथ रोखत अंतिम फेरीत धडक

मनू भाकरला प्रशिक्षण दिलं

जसपाल राणा यांनी पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकरलाही प्रशिक्षण दिलं होतं. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमधून रिकाम्या हाताने परतल्यानंतर मनू भाकरने आपल्या अपयशासाठी जसपाल राणा यांना जबाबदार धरलं होतं. मात्र, २०२३ मध्ये जसपाल राणा मनू भाकरचे प्रशिक्षक बनले आणि त्यांनी तिला पॅरिस ऑलिम्पिकसाठी तयार होण्यास मदत केली. जेव्हा मनू भाकरने ऑलिम्पिक पदक जिंकलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com